मुंबई : (Mohan Bhagwat USA Tour) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत २५ ऑगस्टपासून अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारतीय वंशाच्या नागरिकांशी संबंधित विविध स्थानिक संघटना आणि संस्थांच्या निमंत्रणावरून सरसंघचालक हा परदेश दौरा करणार आहेत. संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.(Mohan Bhagwat USA Tour)
या दौऱ्यात डॉ. मोहनजी भागवत भारतीय वंशाच्या नागरिकांशी तसेच स्थानिक संघटना आणि संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती आहे की, या दौऱ्यात डॉ. भागवत न्यूयॉर्कमध्ये अमेरिकन हिंदू फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. हा कार्यक्रम रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे.(Mohan Bhagwat USA Tour)