मुंबई : (Jio 10 Years 5.79 Crore Customers) सप्टेंबर २०१६मध्ये सुरू झालेल्या रिलायन्स जिओने मुंबई आणि महाराष्ट्रातील दूरसंचार क्षेत्रात दमदार कामगिरी केली आहे. जून २०२६ पर्यंत जिओने एकूण तब्बल ५.७९ कोटी इतका ग्राहकवर्ग जोडला आहे.
सप्टेंबर २०१६मध्ये सुरुवातीला पहिल्याच महिन्यात १५.५ लाख ग्राहक जोडणाऱ्या जिओची कामगिरी ४५ टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दराने (CAGR) झाली. मुंबई-महाराष्ट्रातील एकत्रित वायरलेस ग्राहक बाजारपेठेत जिओचा वाटा सुमारे ४० टक्के आहे, अशी माहिती जिओतर्फे यानिमित्त देण्यात आली.
जिओने सुरुवातीपासूनच ४G आणि ऑल-IP नेटवर्कसह बाजारात प्रवेश करणाऱ्या जिओने परवडणारा डेटा आणि मोफत आउटगोइंग कॉल्सद्वारे तत्कालीन बाजारपेठेतील टॅरिफ रचनेला आव्हान दिले. जिओच्या ४G VoLTE-आधारित नेटवर्कमुळे आणि मोफत कॉलिंगमुळे ग्राहकांसाठी मोबाइल सेवांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. (Jio 10 Years 5.79 Crore Customers)
जिओ बाजारात उतरण्यापूर्वी ऑगस्ट २०१६मध्ये मुंबई आणि महाराष्ट्रात मिळून सुमारे ११.५२ कोटी वायरलेस ग्राहक होते. हे सर्व ग्राहक तत्कालीन विद्यमान ऑपरेटर्सकडे होते. जून २०२६ पर्यंत एकूण बाजारपेठ वाढून सुमारे १४.४७ कोटी ग्राहकांवर पोहोचली आहे. यापैकी एकट्या जिओकडे ५.७९ कोटी कनेक्शन्स आहेत. इतर सर्व ऑपरेटर्सचा एकत्रित ग्राहकवर्ग सध्या सुमारे ८.६७ कोटी आहे. जिओच्या प्रवेशापूर्वी असलेल्या ११.५२ कोटींच्या तुलनेत ही संख्या सुमारे २.८४ कोटींनी कमी, म्हणजेच जवळपास २५ टक्क्यांची घट दर्शवते. (Jio 10 Years 5.79 Crore Customers)
मुंबई आणि महाराष्ट्रात जिओचे व्यापक नेटवर्क, मजबूत फोर-जी कव्हरेज आणि परवडणारे दर यामुळे मोठ्या संख्येने प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या ग्राहकांनी जिओकडे मोर्चा वळवला. त्यामुळे इतर ऑपरेटर्सचा एकत्रित ग्राहकवर्ग कमी होत असतानाही जिओने अत्यंत वेगाने बाजारपेठेतील आपला हिस्सा वाढवला. (Jio 10 Years 5.79 Crore Customers)
चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत अग्रस्थानी
मुंबई-महाराष्ट्राच्या एकत्रित बाजारपेठेत क्रमांक २चे स्थान मिळवण्यासाठी जिओला दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी लागला. सप्टेंबर २०१६ मध्ये लॉन्च झाल्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये जिओने एअरटेलला मागे टाकले. (Jio 10 Years 5.79 Crore Customers)
देशभरातील ग्राहकवर्ग ५३.३३ कोटींवर
जिओची वाढ केवळ मुंबई आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही. जून २०२६ पर्यंत जिओचा देशभरातील ग्राहकवर्ग ५३.३३ कोटींवर पोहोचला असून, त्यापैकी २८.५ कोटी ग्राहक ५G सेवांचा वापर करत आहेत. जिओच्या नेटवर्कवरील मासिक डेटा वापरही प्रति ग्राहक ४३.७ GB पर्यंत वाढला आहे. (Jio 10 Years 5.79 Crore Customers)
मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.