युवकांच्या स्वप्नांना मिळणार नवी दिशा! पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-२०२६’

Developed India Youth Conclave 2026
 
मुंबई : (Developed India Youth Conclave 2026) क्रीडा, नवोन्मेष, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून देशभरातील युवकांना एकत्र आणण्यासाठी पुण्यात ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-२०२६’ आयोजित करण्यात येणार आहे. हा तीन दिवसीय युवा महोत्सव राष्ट्रीय स्तरावरील युवकांना जोडणारा दुवा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
 
वर्षा निवासस्थानी झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या बैठकीत महोत्सवाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त दीपक सिंगला तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. (Developed India Youth Conclave 2026)
 
पुण्यातील बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे होणाऱ्या या संमेलनात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून सुमारे एक हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातून ३००, तर अन्य राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतून ७०० प्रतिनिधी सहभागी होतील. महोत्सवाला राज्यभरातील एक लाखांहून अधिक युवकांचा सहभाग राहील, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. (Developed India Youth Conclave 2026)
 
महोत्सवात ‘वॉरिअर, फ्युचर आणि कल्चरल’ असे तीन अनुभव क्षेत्र असतील. वॉरिअर झोनमध्ये स्वसंरक्षण, फिटनेस, क्रीडा विज्ञान आणि साहसी उपक्रम; फ्युचर झोनमध्ये तंत्रज्ञान, नवोन्मेष व उद्योजकता; तर कल्चरल झोनमध्ये लोककला, लोकसंगीत, योग, ध्यान, हस्तकला आणि महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीचे प्रदर्शन केले जाणार आहे. (Developed India Youth Conclave 2026)
 
महोत्सवासाठी ऑनलाइन नोंदणी, QR कोड आधारित डिजिटल ओळखपत्र आणि मोबाईल कार्यक्रम मार्गदर्शकाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी खासगी गुंतवणूक आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी वाढविण्यावरही भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. (Developed India Youth Conclave 2026)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर