आंध्र प्रदेशात रा.स्व.संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठक; महत्त्वाच्या विषयांवर होणार विचार मंथन

    12-Aug-2026   
RSS Coordination Meeting
 
मुंबई : (RSS Coordination Meeting) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रेरित विविध संघटनांची अखिल भारतीय समन्वय बैठक दि. १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम जिल्ह्यातील गुडीलोवा येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संघ प्रेरित एकूण ३२ संघटनांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
 
विविध संघटनांचे अखिल भारतीय अध्यक्ष, महासचिव, संघटन मंत्री तसेच काही निवडक पदाधिकारी उपस्थित राहतील. या सर्व संघटना गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक जीवनात सातत्याने सक्रिय आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी कार्य करत असताना, राष्ट्रहिताच्या दृष्टीने लोकजागृती तसेच व्यवस्थेत आवश्यक सुधारणा आणि परिवर्तन घडवून आणण्याच्या दीर्घकालीन कार्यात त्या तत्परतेने कार्यरत आहेत.(RSS Coordination Meeting)
 
या बैठकीत प्रामुख्याने सर्व संघटना आपापल्या कार्याची माहिती सादर करतील, तसेच विविध महत्त्वाच्या विषयांवर आपले निरीक्षण आणि सूचना मांडतील. सर्व संघटनांमधील परस्पर समन्वय आणि सहकार्य अधिक प्रभावी करण्याबरोबरच जनकल्याण आणि धोरणात्मक विषयांवर संवाद यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. तसेच लोकसंख्येतील असमतोल, व्यसनमुक्ती, युवकांमध्ये जागृती, पंच परिवर्तनाची अंमलबजावणी, विकासाची भारतीय संकल्पना यांसह वर्तमान परिस्थितीशी संबंधित विविध विषयांवरही बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे.(RSS Coordination Meeting)
 
या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, सर्व सह-सरकार्यवाह तसेच अखिल भारतीय कार्यविभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत. भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच राष्ट्र सेविका समिती यांसह एकूण ३२ संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते या बैठकीत सहभागी होणार आहेत.(RSS Coordination Meeting)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर