एल निनोच्या संभाव्य संकटासाठी महापारेषण सज्ज; अखंडित वीजपुरवठा आणि ग्रिड स्थैर्यासाठी

१२ कलमी कृती आराखडा; सर्व मुख्य अभियंत्यांना सतर्कतेचे निर्देश

El Nino Mega Transmission
 
मुंबई : (El Nino Mega Transmission) एल निनोच्या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अखंडित वीजपुरवठा आणि ग्रिडचे स्थैर्य कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (महापारेषण) विशेष खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. केंद्राच्या ऊर्जा मंत्रालयाच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व परिमंडळांना १२ कलमी कृती आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.(El Nino Mega Transmission)
 
एल निनोमुळे दीर्घकाळ उष्णतेची लाट, विजेच्या मागणीत वाढ आणि प्रतिकूल हवामानामुळे पारेषण यंत्रणेवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व अतिउच्चदाब वीजवाहिन्या, उपकेंद्रे, ट्रान्सफॉर्मर्स, सर्किट ब्रेकर्स आणि संरक्षण यंत्रणांची प्रतिबंधात्मक देखभाल पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. वीजवाहिन्या, स्विचयार्ड, ट्रान्सफॉर्मर्स आणि बसबारची थर्मोव्हिजन स्कॅनिंगद्वारे तपासणी करून संभाव्य दोष तत्काळ दूर करण्याचे निर्देश आहेत. तसेच SCADA, दळणवळण व्यवस्था, स्टेशन बॅटरी आणि संरक्षण प्रणालीची कार्यक्षमता तपासली जाणार आहे.(El Nino Mega Transmission)
 
आपत्कालीन परिस्थितीत वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर्स, कंडक्टर्स, इन्सुलेटर्स आणि टॉवरचे सुटे भाग उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन पथके, वाहने आणि आवश्यक साधने २४ तास सज्ज ठेवण्यात येणार आहेत. हवामानाच्या अंदाजावर लक्ष ठेवून MSLDC, RLDC, वीजनिर्मिती केंद्रे आणि वितरण कंपन्यांशी समन्वय साधण्यावरही भर देण्यात आला आहे. पूर्वतयारीचा साप्ताहिक अहवाल मुख्य कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश मुख्य अभियंत्यांना देण्यात आले आहेत.(El Nino Mega Transmission)
 
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर