मुंबई : ('Made in India' Railway Coaches For Bangladesh) भारतीय रेल्वेच्या उत्पादन क्षमतेचा आणखी एक ठसा परदेशात उमटणार आहे. कपूरथळा येथील रेल कोच फॅक्टरी बांगलादेश रेल्वेसाठी तयार केलेल्या १९ आधुनिक लिंके हॉफमन बुश (एलएचबी) ब्रॉडगेज प्रवासी डब्यांची पहिली रेक दि.१२ ऑगस्ट २०२६ रोजी निर्यात करणार आहे. बांगलादेशच्या परिचालन आणि प्रवासी गरजा लक्षात घेऊन या डब्यांमध्ये विशेष तांत्रिक बदल करण्यात आले आहेत.
या पहिल्या रेकमध्ये ३ एसी स्लीपर कार, ३ एसी चेअर कार, ११ नॉन-एसी चेअर कार आणि २ पॉवर कार यांचा समावेश आहे. प्रवाशांचा आराम वाढविण्यासाठी विशेष रिक्लायनिंग चेअर्स, स्टेनलेस स्टील आर्मरेस्ट आणि फुटरेस्ट बसविण्यात आले आहेत. ('Made in India' Railway Coaches For Bangladesh)
सीसीटीव्हीपासून बेबी केअर रूम पर्यंत सुविधा
या डब्यांमध्ये प्रवासी सुरक्षेसाठी इंटिग्रेटेड सीसीटीव्ही सर्व्हेलन्स आणि पॅसेंजर अलार्म सिस्टम देण्यात आली आहे. याशिवाय अंशतः उघडता येणाऱ्या खिडक्या, बेबी केअर रूम आणि प्रार्थना कक्ष यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. एसी डब्यांमध्येही पंख्यांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ('Made in India' Railway Coaches For Bangladesh)
EN 15227 मानकानुसार क्रॅश सुरक्षा
या डब्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे युरोपियन मानक EN 15227 नुसार विकसित केलेली रचना टक्कर झाल्यास प्रवाशांची सुरक्षितता वाढविण्यासाठी कार बॉडी शेलमध्ये आवश्यक ते व्यापक बदल करण्यात आले आहेत. बांगलादेशातील विशिष्ट परिचालन परिस्थिती लक्षात घेऊन डब्यांचे छतही अधिक मजबूत करण्यात आले आहे. गर्दीच्या काळात छतावर अतिरिक्त भार येण्याची शक्यता लक्षात घेऊन ही रचना करण्यात आली आहे. तसेच, भारतीय रेल्वेतील पारंपरिक ७५० व्होल्ट प्रणालीऐवजी या डब्यांमध्ये ४१५ व्होल्ट ऑपरेशनसाठी विशेष इलेक्ट्रिकल सिस्टम विकसित करण्यात आली आहे. ('Made in India' Railway Coaches For Bangladesh)
२०० डब्यांची ऑर्डर
आरसीएफ आणि बांगलादेश रेल्वे यांच्यातील सहकार्याला आधीपासूनच मजबूत पार्श्वभूमी आहे. २०१५-१६ मध्ये आरसीएफने बांगलादेश रेल्वेला १२० एलएचबी ब्रॉडगेज प्रवासी डब्यांचा पुरवठा केला होता. या यशस्वी भागीदारीनंतर बांगलादेश रेल्वेने २०२४ मध्ये RITESच्या माध्यमातून RCFला २०० ब्रॉडगेज प्रवासी डब्यांच्या निर्मिती व पुरवठ्याची ऑर्डर दिली. बांगलादेशसाठी तयार करण्यात येत असलेले हे डबे भारतीय रेल्वेच्या आधुनिक तंत्रज्ञान, अभियांत्रिकी कौशल्य आणि देशांतर्गत उत्पादन क्षमतेचे उदाहरण ठरत आहेत. ('Made in India' Railway Coaches For Bangladesh)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.