बोरिवली नॅशनल पार्कमधील सिंह-व्याघ्र विहारात ‘इन-ब्रिडिंग’चा धोका

सिंह-व्याघ्र विहारातील एकमेव नरांवर प्रजननाचा भार; अनुवंशिक विविधता टिकविण्याचे आव्हान

    12-Aug-2026
sgnp lion-tiger cage


मुंबई (विशेष प्रतिनिधी) –
बोरिवलीच्या ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’तील ‘भारत’ या नर आशियाई सिंहाच्या मृत्यूनंतर उद्यानातील सिंहांच्या प्रजननाबाबत नवे आव्हान उभे राहिले आहे (sgnp lion-tiger cage). सिंह विहारात सध्या ‘मानस’ हा एकमेव नर सिंह आहे. त्याच्यापासून जन्मलेल्या मादी पिल्लांनी भविष्यात प्रजननक्षम वय गाठल्यानंतर त्याच्यासोबत प्रजनन होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते (sgnp lion-tiger cage). अशी परिस्थिती निर्माण झाल्यास इन-ब्रिडिंग अर्थात जवळच्या नात्यातील प्रजननाचा धोका निर्माण होईल (sgnp lion-tiger cage). त्यामुळे राष्ट्रीय उद्यानातील सिंह विहारात आता केवळ पिल्लांची संख्या वाढविण्यापेक्षा त्यांच्या अनुवंशिक विविधतेचे व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. (sgnp lion-tiger cage)
 
 
‘भारत’ हा सुमारे चार वर्षांचा आशियाई सिंह होता. जानेवारी २०२५मध्ये त्याला गुजरातमधील जुनागढ येथील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. दीर्घकाळापासून मागील पायांतील अशक्तपणा आणि अन्य गंभीर आरोग्य समस्यांनी त्रस्त असलेल्या भारताला २३ मे २०२६ रोजी विशेष उपचारांसाठी नागपूरच्या गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्याच्यावर पक्षाघात, रक्तक्षय, रक्तातील संसर्ग, जखमा आणि अन्य गुंतागुंतींसाठी उपचार सुरू होते. अखेर १० ऑगस्ट २०२६ रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.भारतच्या मृत्यूमुळे राष्ट्रीय उद्यानाच्या सिंह विहारात मानस हा एकमेव नर राहिला आहे. मानसकडून भारतीला तीन आणि मानसीला एक पिल्लू झाले आहे. मात्र, ही सर्व पिल्लं मादी आहेत. ही पिल्ले पुढे प्रजननक्षम झाल्यानंतर त्यांचे मानससोबत प्रजनन झाल्यास पिता–पुत्री प्रजननाची शक्यता निर्माण होईल. हीच इन-ब्रिडिंगची प्रमुख चिंता आहे. भारतच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली ही परिस्थिती भविष्यातील प्रजनन नियोजनाचा इशारा देत आहे. त्यामुळे राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने वेळेत नवीन नर आणण्याचे किंवा इतर वैज्ञानिक प्रजनन व्यवस्थापनाचे नियोजन केले, तर इन-ब्रिडिंगचा संभाव्य धोका टळू शकेल.
 
 
व्याघ्र विहारात देखील सारखीच परिस्थिती
राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र विहारात देखील सिंह विहारासारखीच परिस्थिती आहे. कारण, त्याठिकाणी देखील बाजीराव नावाचा एकच प्रजननक्षम नर वाघ असून त्याच्याकडून श्रीवल्ली वाघिणीला पिल्लं झाली आहेत. यामधील काही पिल्लं नर आहेत. मात्र, जन्मास आलेली सर्वच पिल्लं ही एकमेकांची भावंड असल्याने तिथेही ‘इन-ब्रिडिंग’ होण्याचा धोका आहेच.
 
 
इन-ब्रिडिंग म्हणजे नेमके काय?
एकमेकांशी जवळचे अनुवंशिक नाते असलेल्या प्राण्यांमध्ये प्रजनन होणे म्हणजे इन-ब्रिडिंग. उदाहरणार्थ, पिता आणि मुलगी, आई आणि मुलगा किंवा भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रजनन हे जवळच्या नात्यातील प्रजननाचे प्रकार आहेत. इन-ब्रिडिंगमुळे प्राण्याच्या जनुकांमध्ये समयुग्मजता (homozygosity) वाढते. म्हणजे आई-वडिलांकडून आलेल्या जनुकांच्या दोन प्रती समान असण्याची शक्यता वाढते. त्यातून पुढील पिल्लांमध्ये जन्मजात विकृतींचा धोका वाढणे, प्रजननक्षमता कमी होणे, नरांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता किंवा संख्या कमी होणे, संसर्गजन्य आजारांना अधिक संवेदनशीलता, वाढ आणि शारीरिक तंदुरुस्तीवर परिणाम, काही आनुवंशिक विकारांचे प्रमाण वाढणे, या प्रकारचे धोके निर्माण होऊ शकतात. या एकत्रित परिणामाला ‘इन-ब्रिडिंग डिप्रेशन’ म्हटले जाते. म्हणूनच संवर्धन प्रजनन कार्यक्रमाचा उद्देश फक्त ‘जास्तीत जास्त पिल्ले जन्माला घालणे’ नसतो. निरोगी आणि अनुवंशिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण लोकसंख्या निर्माण करणे हा त्यामागचा मुख्य हेतू असतो.




संबंधित मजकूर