कल्याण (Children's Temple School): बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपला सांस्कृतिक वारसा जपून बुधवार दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी दीप अमावस्येच्या निमित्ताने बालक मंदिर शाळेच्या नूतन वास्तूमध्ये मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा केला. यावेळी बहुरंगी दिव्यांनी बालक मंदिर शाळा उजळून निघाली होती. (Children's Temple School)
याप्रसंगी, बालक मंदिर संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरातून विविध आकाराचे आणि बहुरंगी दिवे आणि इतर दिवे आणले आणि भव्य प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन कल्याण डोंबिवली महानगरपालिका नगरसेवक( प्रभाग क्र. ७ ब ) शामल गायकर व बालक मंदिर संस्था पदाधिकारी रमेश गोरे यांच्या हस्ते झाले. हिंदू संस्कृतीत दीपाला खूप महत्त्वाचे स्थान आहे आणि कुटुंबातील दुःख टळेल, अज्ञानाचा अंधार दूर होईल आणि दीप प्रकाश देतो त्याप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पडावा अशी प्रार्थना करण्यात आली. दिव्यांची सजावट पाहण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
याप्रसंगी बालक मंदिर संस्थेच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेतील सुमारे ६५० विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामिनी पाटील यांनी केले व पाहुण्यांचा परिचय व स्वागत मीनाक्षी सरोदे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन पालक शिक्षक संघाचे सचिव शशिकांत गवारे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे फेसबुक वर लाईव्ह प्रक्षेपण जितेंद्रसिंग निकुंभ यांनी केले. कार्यक्रमासाठी मंडप व्यवस्था मंगेश घाटे यांनी केली. पूर्व प्राथमिक शाळेच्या शिक्षिका अलका जडे यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले. पूर्व प्राथमिक शाळेच्या निमंत्रित सदस्या वृषाली जोशी व प्राथमिक शाळेचे निमंत्रित सदस्य राजेंद्र फडके हे उपस्थित होते . बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळांमधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला आणि कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी बहुमोल सहकार्य केले. या कार्यक्रमाला संस्थेच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पवार, पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्यध्यापिका अनुजा पेठे तसेच ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा मोरे व विद्या घुले, गौरी रानडे यांचे मोल्यवान मार्गदर्शन लाभले.(Children's Temple School)