मूड खराब असेल तर मिळणार ‘अनहॅप्पी लीव्ह’? जाणून घ्या!

अनोखं धोरण आहे तरी काय? भारतात का सुरू आहे ही चर्चा?

    11-Aug-2026

Unhappy leaves  
 
मुंबई : (Unhappy) आज कंटाळा आला आहे, कशात मन लागत नाही आहे; तर आज ऑफिसला जात नाही, असा विचार केवळ आपण सर्वसामान्य कल्पना करू शकतो. प्रत्यक्षात असे होईल का? अशी सुट्टी कुठे असते का?
 
तर हो! कामाचा ताण आणि सततच्या धावपळीतून कर्मचारी त्रस्त होत असताना चीनमधील एका कंपनीच्या अनोख्या रजा धोरणाची चर्चा सुरू आहे. आणि ती आगळीवेगळी रजा आहे 'Unhappy Leave' म्हणजेच मन:स्थिती ठीक नसल्यास घेता येणारी विशेष रजा. (Unhappy)
 
'Unhappy Leave' म्हणजे नक्की काय?
 
चीनमधील Pang Dong Lai या रिटेल कंपनीमध्ये Unhappy Leave चे धोरण लागू आहे. कंपनीचे संस्थापक Yu Dong Lai यांनी २०२४ मध्ये ही संकल्पना सुरू केली. “If you’re not happy, don’t come to work” ही विचारधारा कंपनीमध्ये पाळली जाते.
धोरणानुसार कर्मचारी वर्षाला १० दिवसांची अतिरिक्त रजा घेऊ शकतात. या रजेसाठी कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवण्याची किंवा सविस्तर कारणं देण्याची गरज नसते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मॅनेजरलाही ही रजा नाकारण्याची परवानगी नाही. (Unhappy)
 
भारतात का चर्चा सुरू झाली?
 
उद्योगपती हर्ष गोयनका यांनी आपल्या सोशल मीडियावर ही बातमी शेअर करून, "अशी रजा भारतात का नाही?" असा प्रश्न उपस्थित केला. (Unhappy)
 
मुख्य मुद्दा म्हणजे भारतात अशी रजा सुरू झाली आहे असे नाही; तर भारतातही मानसिक आरोग्याला आजारी पडल्यावरच नव्हे, तर ताण वाढण्यापूर्वीही महत्त्व देण्याची गरज आहे का, यावर या धोरणामुळे चर्चा सुरू झाली आहे. (Unhappy)
 
मानसिक आरोग्य की कामचुकारपणा?
 
यू डोंगलाई यांच्या मते, कर्मचारी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असताना कामावर आल्यास त्याचा परिणाम कामाच्या गुणवत्तेवर तसेच आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे अशा वेळी विश्रांती घेण्याची मुभा असावी, असा या धोरणामागील विचार आहे.
मात्र, या निर्णयामुळे “मानसिक आरोग्याची काळजी या नावाखाली कामचुकारपणाची पळवाट शोधली जातेय का?” असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. काहींच्या मते, अशा रजेमुळे कर्मचाऱ्यांना burnout पासून दूर राहण्यास मदत होऊ शकते; तर काही जण या सुविधेचा गैरवापर होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. (Unhappy)
 
 




संबंधित मजकूर