एसटी कर्मचाऱ्यांचा जुलैचा पगार कधी होणार? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टच सांगितलं - वाचा सविस्तर

    11-Aug-2026
July Salary Of ST Employees
 
मुंबई : (July Salary Of ST Employees) "दर महिन्याच्या ७ तारखेला अदा होणारे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रशासकीय दिरंगाई आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे यंदा काहीसे लांबले. मात्र, एसटी महामंडळाच्या तब्बल ८६ हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन मंगळवार दि.११ रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा होईल." अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोमवार दि.१० रोजी दिली. (July Salary Of ST Employees)
 
एसटी महामंडळाकडून दर महिन्याला शासनाच्या विविध सवलतींच्या प्रतिपूर्ती रकमेची माहिती वित्त विभागाला नियमितपणे सादर केली जाते. जुलै महिन्याची माहितीही वेळेत सादर करण्यात आली होती. मात्र, शासनाकडून प्रतिपूर्तीची रक्कम वेळेत प्राप्त न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम झाला. साधारणपणे महिन्याच्या ७ ते १० तारखेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले जाते. परंतु, यावेळी सलग आलेल्या सुट्ट्या आणि प्रशासकीय प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे वेतन १० तारखेनंतर गेले. (July Salary Of ST Employees)
 
कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत व्हावे यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून थेट वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार संवाद साधला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रतिपूर्ती रकमेबाबतचा शासन निर्णय सोमवार दि.१० रोजी प्राप्त झाला असून, ११ ऑगस्ट रोजी सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वेतन जमा होणार आहे. (July Salary Of ST Employees)
 
 




संबंधित मजकूर