पवारांचे खासदार मोदींच्या भेटीला; मविआत पोटदुखी

    11-Aug-2026   
 
Sharad Pawar
 
मुंबई : ( NCP-SP MPs meeting with PM Modi ) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ८ खासदारांनी सोमवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र, या भेटीमुळे शरद पवार गटाच्या मविआतील मित्रपक्षांना पोटदुखी सुरु झाल्याचे दिसते.
 
केंद्रात आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमधील वाढता संवाद, नेत्यांच्या भेटीगाठी सध्या चर्चेचा विषय ठरताहेत. या वाढत्या भेटीगाठींमुळे महाविकास आघाडीतील त्यांच्या मित्रपक्षांमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरल्याचे दिसते. ( NCP-SP MPs meeting with PM Modi )
 
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार या भेटीवर म्हणाले की, "आमचे लक्ष आहे. शरद पवारांचे खासदार विकासासाठी भेटत असल्यास आमच्या शुभेच्छा आहेत. पण खूप दिवसांपासून या भेटींवरून चर्चा झाल्यात. वारंवार हे लोक मोदी आणि अमित शाह यांच्या दरबारात का जात आहेत? याचा अर्थ आतून काहीतरी शिजलेले असावे," असे ते म्हणाले. तर, उबाठा गटाच्या अंबादास दानवे यांनी शरद पवार गटाचे खासदार मोदींना भेटून काय दिवे लावणार आहेत? असा सवाल केला. ( NCP-SP MPs meeting with PM Modi)
 
मित्रपक्षांची समजूत कशी घालणार?
 
त्यामुळे शरद पवार गटाच्या वाढत्या भेटी त्यांच्या मित्रपक्षांना फारशा रूचलेल्या दिसत नाहीत. वास्तविक शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीमागे राजकीय गणिते शोधली जातात. सध्याच्या घडामोडीही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे आता शरद पवार गट या सगळ्याला कसे उत्तर देतात आणि आपल्या मित्रपक्षांची कशी समजूत घालतात, ते पाहणे औत्सुक्याचे असेल. ( NCP-SP MPs meeting with PM Modi)





अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर