मुंबई : (Mulund Station Live Status of trains) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांच्या प्रवासाचा खोळंबा झाला. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर वसई रोड, दादर आणि गोरेगाव येथे झालेल्या पॉइंट बिघाडांमुळे लोकल सेवा विस्कळीत झाली. त्याचवेळी मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकात एमआरव्हीसीच्या डेकच्या कामादरम्यान बांधकाम साहित्य ओव्हरहेड वायरवर पडल्याने मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडाल्या. त्यामुळे सीएसएमटी दिशेच्या धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक काही काळ थांबवण्यात आली. या तांत्रिक बिघाडांमुळे अनेक लोकल २० ते ४० मिनिटे उशिराने धावत होत्या.
वसई रोडला पहाटेच पॉइंट फेल
पश्चिम रेल्वेवरील पहिला बिघाड वसई रोड येथे पहाटे ४.४६ वाजता झाला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावरील पॉइंटमध्ये बिघाड झाल्याने या मार्गावरील उपनगरीय वाहतुकीवर परिणाम झाला. त्यानंतर दादर येथे सकाळी १०.१० वाजता अप आणि डाऊन जलद मार्गावरील पॉइंटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. दादरमधील बिघाडामुळे अप जलद मार्गावरील काही लोकल माटुंगा आणि माहीमदरम्यान खोळंबल्या. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काही जलद लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे जलद आणि धीम्या दोन्ही मार्गांवरील लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. Mulund Station Live Status of trains
गोरेगावमध्ये हार्बर मार्गही प्रभावित
यानंतर गोरेगाव येथे सकाळी १०.२२ वाजता अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील पॉइंटमध्ये बिघाड झाला. त्यामुळे सीएसएमटी ते पनवेल तसेच गोरेगावदरम्यानच्या हार्बर मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, जलद लोकल विरार ते चर्चगेट सुमारे २७ मिनिटे, तर चर्चगेट ते विरार सुमारे १९ मिनिटे उशिराने धावत होत्या. दुपारच्या वेळेतही काही लोकल २० ते ३० मिनिटे विलंबाने धावत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. ग्रँट रोड ते चर्चगेटदरम्यान लोकलच्या फेऱ्या एकमेकांच्या जवळ आल्याने गर्दी वाढली आणि प्रवाशांचा प्रवास आणखी लांबला. (Mulund Station Live Status of trains)
मुलुंडमध्ये बांधकाम साहित्य ओव्हरहेड वायरवर
दरम्यान, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरही तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक प्रभावित झाली. मुलुंड स्थानकात सकाळी ११.५३ वाजता एमआरव्हीसीकडून प्रवासी डेकचे काम सुरू असताना बांधकाम साहित्य ओव्हरहेड वायरवर पडले. त्यानंतर वायरमध्ये मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडाल्याचे दिसून आले. (Mulund Station Live Status of trains)
घटनेची माहिती मिळताच खबरदारीचा उपाय म्हणून सीएसएमटी दिशेच्या धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक थांबवण्यात आली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली. रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बांधकाम साहित्य हटवण्याचे तसेच ओव्हरहेड वायरची पाहणी करण्याचे काम सुरू केले. (Mulund railway station incident)
१२.१७ वाजता वाहतूक पूर्ववत
तांत्रिक कर्मचाऱ्यांनी ओव्हरहेड वायरवरील बांधकाम साहित्य हटवून आवश्यक तपासणी आणि दुरुस्तीचे काम केले. दुपारी १२.१५ वाजेपर्यंत वायरवरील साहित्य हटवण्यात आले. त्यानंतर १२.१७ वाजता सीएसएमटी दिशेच्या धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक पूर्ववत करण्यात आली. Mulund Station Live Status of trains
मात्र, या बिघाडामुळे काही लोकल गाड्यांना विलंब झाला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील तांत्रिक अडचणींमुळे मुंबईची ‘लाईफलाइन’ विस्कळीत झाली आणि हजारो चाकरमान्यांना गर्दी, विलंब आणि खोळंब्याचा सामना करावा लागला. Mulund Station Live Status of trains
एका दिवसात चार ठिकाणी तांत्रिक अडथळे :
रेल्वे ठिकाण वेळ बिघाड
पश्चिम रेल्वे वसई रोड पहाटे ४.४६ पॉइंट बिघाड
पश्चिम रेल्वे दादर सकाळी १०.१० जलद मार्गावरील पॉइंट बिघाड
पश्चिम रेल्वे गोरेगाव सकाळी १०.२२ हार्बर मार्गावरील पॉइंट बिघाड
मध्य रेल्वे मुलुंड सकाळी ११.५३ ओव्हरहेड वायरवर बांधकाम साहित्य Mulund Station Live Status of trains
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.