अयोध्येच्या धर्तीवर ६ डिसेंबर रोजी मथुरेत होणार कारसेवा!

श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती आंदोलनाबाबत साधू-संतांनी केली मोठी घोषणा

    11-Aug-2026   
Mathuret 6 Decembral Karseva
 
मुंबई : (Krishna Janmabhoomi Karseva) श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती आंदोलनाबाबत साधू-संतांनी मोठी घोषणा केली आहे. दि. ९ ऑगस्ट रोजी प्रस्तावित असलेली कारसेवा तूर्तास स्थगित करण्यात आली असून येत्या ६ डिसेंबर रोजी मथुरेत कारसेवा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. चित्रगुप्त पीठाधीश्वर डॉ. स्वामी सच्चिदानंद महाराज यांनी साधू-संतांच्या उपस्थितीत घंटे-घडियाळ आणि शंखनादाच्या गजरात सदर घोषणा केली. दि. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी ढाचा पाडण्यात आता होता, त्याच पार्श्वभूमीवर ही कारसेवा करण्यात येणार असल्याचे साधू-संतांनी सांगितले.(Krishna Janmabhoomi Karseva)
 
स्वामी सच्चिदानंद महाराज यांनी स्पष्ट केले की, ६ डिसेंबरपूर्वी ते स्वतः देशभर फिरून साधू-संत, आखाडा परिषदेचे महंत आणि महामंडलेश्वर यांची भेट घेणार आहेत. तसेच त्यांना मथुरेत पोहोचून कारसेवेत सहभागी होण्याचे आवाहन करणार आहेत. स्वामी सच्चिदानंद महाराज यांनी ६ डिसेंबरपूर्वी येणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ठाकूरजींना भोग अर्पण करण्याची परवानगी न्यायालयाकडून मागितली आहे. आपल्या मागणीपत्रात वर्शिप ॲक्ट रद्द करण्याची मागणी केली असून श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणाची सुनावणी फास्ट-ट्रॅक न्यायालयात घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.(Krishna Janmabhoomi Karseva)
 
चित्रगुप्त पीठाधीश्वर स्वामी सच्चिदानंद महाराज यांनी यापूर्वी ९ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मभूमीवर अयोध्येच्या धर्तीवर कारसेवा करण्याची घोषणा केली होती. मात्र, स्थानिक प्रशासनासोबत झालेली चर्चा आणि सध्या सुरू असलेल्या कावड यात्रेच्या व्यवस्थेचा विचार करून, आखाडा परिषद आणि वरिष्ठ साधू-संतांच्या निर्णयानंतर कारसेवा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवारी सकाळी छटीकरा-गोवर्धन मार्गावरील झुल्हेदी चित्रगुप्त आश्रमात श्रीमद्भागवत कथेच्या समारोपानंतर विशेष हवन-पूजनाचे आयोजन करण्यात आले. (Krishna Janmabhoomi Karseva)
 
स्वामी सच्चिदानंद महाराज यांनी साधू-संतांच्या उपस्थितीत विधिवत पूजा-अर्चना करून श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्तीची प्रार्थना केली. त्यांनी सांगितले की, आश्रमात हे हवन-पूजन बाल गोपाल श्रीकृष्णलाल आपल्या मूळ गर्भगृहात पूर्ण सन्मानाने विराजमान होईपर्यंत दररोज अखंडपणे सुरू राहील.(Krishna Janmabhoomi Karseva)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर