महाराष्ट्रातील दोन जलमार्गांना मिळणार नवी गती;२०२९-३० मध्ये विकासाचे नियोजन

सावित्री नदी-बाणकोट खाडी आणि दाभोळ खाडी-वशिष्ठी नदीचा समावेश;देशभरात १९ नव्या राष्ट्रीय जलमार्गांचा विकास

    11-Aug-2026
Maharashtra National Waterway
 
मुंबई : (Maharashtra National Waterway) देशातील अंतर्देशीय जलवाहतूक आणि जलपर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या जलमार्गांच्या विकासाचे नियोजन केले आहे. राष्ट्रीय जलमार्ग-८९ (सावित्री नदी व बाणकोट खाडी) आणि राष्ट्रीय जलमार्ग-२८ (दाभोळ खाडी–वशिष्ठी नदी) यांचा २०२९-३० या आर्थिक वर्षात विकास करण्याचे नियोजन केंद्र सरकारने केले आहे. केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.(Maharashtra National Waterway)
 
देशात अंतर्देशीय जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय जलमार्ग कायदा, २०१६ अंतर्गत १११ अंतर्देशीय जलमार्गांना राष्ट्रीय जलमार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यापैकी सध्या ३२ जलमार्गांवर मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक सुरू आहे. पुढील पाच वर्षांत प्रामुख्याने क्रूझ पर्यटन आणि प्रवासी फेरी सेवा विकसित करण्यासाठी १९ अतिरिक्त जलमार्गांची निवड करण्यात आली आहे.(Maharashtra National Waterway)
 
महाराष्ट्रातील दोन्ही जलमार्गांचा विकास झाल्यास कोकण किनारपट्टीवरील जलपर्यटन, स्थानिक प्रवासी वाहतूक आणि जलमार्ग आधारित पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः सावित्री नदी आणि बाणकोट खाडी तसेच दाभोळ खाडी-वशिष्ठी नदी परिसरातील पर्यटन क्षमतेचा अधिक प्रभावी वापर करण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. केंद्र सरकारने नव्या जलमार्गांची घोषणा करण्यापूर्वी आधीच घोषित आणि व्यवहार्य राष्ट्रीय जलमार्गांचा मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीसाठी विकास करण्यावर भर असल्याचेही स्पष्ट केले आहे.(Maharashtra National Waterway)
 
महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे
 
NW-89 : सावित्री नदी व बाणकोट खाडी
NW-28 : दाभोळ खाडी–वशिष्ठी नदी
विकासाचे नियोजन : २०२९-३०
प्रमुख उद्देश : क्रूझ पर्यटन व प्रवासी फेरी सेवा
देशातील राष्ट्रीय जलमार्ग : १११
सध्या कार्यरत जलमार्ग : ३२
पुढील पाच वर्षांत विकसित होणारे अतिरिक्त जलमार्ग : १९
 
 




संबंधित मजकूर