लोकलच्या गर्दीतून होणार का सुटका? 'जेन-झी, जेन-अल्फां'साठी तीन स्वतंत्र डब्यांचा प्रस्ताव!

    11-Aug-2026
Gen Z local News 1
( AI-generated Photo )
मुंबई : (local time) मुंबई लोकलने दररोज हजारो नोकरदार वर्ग प्रवास करत असतो, त्यासोबतच कॉलेजसाठी विद्यार्थी वर्गही मोठ्या प्रमाणावर प्रवास करतो. अशा वेळी सकाळी ऑफिसच्या वेळेदरम्यान विद्यार्थ्यांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. बहुतांश वेळी परीक्षेच्या काळात लोकल ट्रेन वेळेत न मिळाल्यामुळे काही अंशी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होते, तसेच गर्दीत सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर येतो. याच पार्श्वभूमीवर भाजप नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी 'जेन झी' अर्थात विद्यार्थी वर्गासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना मागणीपत्र पाठवले आहे.

नेमकी मागणी काय?
 
१२ डब्यांच्या लोकलमधील तीन डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवावेत. (local time)
 
ही सुविधा दररोज पहाटे ५ ते सकाळी ११ वाजेपर्यंत असावी.
 
पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-डहाणू आणि मध्य रेल्वेवरील सीएसएमटी-डोंबिवली / आसनगाव या मार्गावर ही सेवा असावी, असा मागणीपत्रात प्रस्ताव मांडण्यात आला आहे. (local time)
 
मागणीमागचा मुद्दा :
 
लोकल ट्रेनच्या गर्दीच्या वेळी विद्यार्थ्यांना इतर नोकरदार प्रवाशांसोबत प्रवास करावा लागतो. त्यामुळे :
 
शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चढणे-उतरणे कठीण होते.
 
दरवाज्याजवळ होणारी गर्दी सुरक्षेचा प्रश्न निर्माण करते.
 
परीक्षांच्या काळात वेळेवर पोहोचण्याची अडचण वाढते. (local time)
 
प्रत्यक्षात अंमलबजावणी शक्य?
 
घोसाळकरांच्या मागणीचा विचार करता, याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना काही गोष्टींची चाचपणी करणेदेखील महत्त्वाचे ठरेल. तीन डबे म्हणजे लोकलच्या एकूण क्षमतेपैकी २५% भाग; त्यातही संपूर्ण लोकलमध्ये महिलांसाठी, प्रथम श्रेणीसाठी, दिव्यांग प्रवाशांसाठी आणि सामानासाठी आधीच राखीव डबे आहेत. त्यात जर 'विद्यार्थी' श्रेणीचीदेखील वाढ झाली, तर सर्वसाधारण प्रवाशांच्या डब्यांची संख्या कमी होऊन गर्दी अजून वाढू शकते. “विद्यार्थी” कोणाला मानायचे, ओळखपत्राची तपासणी कोण करणार आणि नियम मोडल्यास कारवाई कशी होणार? हे प्रश्नदेखील पुढे येतात. फक्त सकाळी ५ ते ११ ही वेळ शाळा-कॉलेजच्या वेगवेगळ्या वेळापत्रकांसाठी पुरेशी ठरेल का, हाही प्रश्न आहे. (local time)
 
या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी तीन डबे राखीव होणार का, याविषयी रेल्वेकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही; तरीही 'जेन झी' आणि 'जेन अल्फा'साठी केलेल्या या मागणीच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (local time)
 

 




संबंधित मजकूर