कोकणाची पार्श्वभूमी असलेला थरारक चित्रपट येतोय !

    11-Aug-2026

Kokan
 
मुंबई - (kokan marathi) मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच आपल्या वैविध्यपूर्ण आणि आशयघन कथांमधून प्रेक्षकांना नवे विषय आणि वेगळे अनुभव दिले आहेत. याच समृद्ध परंपरेत एका अनोख्या आणि उत्कंठावर्धक विषयासह ‘संडे १९९६’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातील सीमारेषा धूसर करणारी ही कथा रहस्य, नाती, भावना आणि काळाच्या अनपेक्षित खेळाभोवती फिरते. व्ही.आर.के फिल्मस निर्मित ‘संडे १९९६’ चित्रपटाची निर्मिती नीलांबरी विक्रांत यांनी केली असून, चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन जीवन राजेंद्र चव्हाण यांनी केले आहे. या चित्रपटात ओंकार राऊत, गणेश यादव, पंकज विष्णू, सुनील गोडबोले, शिवानी बने, सायली पाचपुते आणि गौरवी महांगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. श्री.भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते ‘संडे १९९६’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शनाच्या निमित्ताने भरतशेठ गोगावले यांनी ‘संडे १९९६’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. (kokan marathi)
या चित्रपटाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे या कथेला असलेली निसर्गरम्य कोकणाची पार्श्वभूमी. कोकणाचा निसर्ग जितका सुंदर आणि मनमोहक आहे, तितकाच तो आपल्या कुशीत अनेक रहस्ये आणि गूढ कथा दडवून ठेवतो. याच निसर्गरम्य आणि गूढ वातावरणाचा प्रभावी वापर ‘संडे १९९६’मध्ये करण्यात आला आहे. काळाची चक्रे जेव्हा उलटी फिरतात, तेव्हा वर्तमानात जगणाऱ्या माणसाचं आयुष्यही बदलून जातं, या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ‘संडे १९९६’ प्रेक्षकांना अनोखा, थरारक सिनेमॅटिक अनुभव द्यायला सज्ज झाला आहे. (kokan marathi)
 
 




संबंधित मजकूर