मुंबई : (Manifesto in support of JNUt Omar Khalid) जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुन्हा एकदा उमर खालिदच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यूएपीए अंतर्गत देशविरोधी बेकायदेशीर कारवायांच्या आरोपांप्रकरणी तुरुंगात असलेल्या उमर खालिदच्या सुटकेची मागणी करण्यात आल्याचा प्रकार यावेळी घडला. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये उमर खालिदच्या ‘फ्रॅक्चर्ड कम्युनिटी’ या पुस्तकावर चर्चेसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम सुरुवातीला ऑडिटोरियममध्ये होणार होता; मात्र परवानगी न मिळाल्याने जेएनयू विद्यार्थी संघटनेने एसएसएस-२ कॅम्पसमध्ये कार्यक्रम आयोजित केला.
अशी माहिती आहे की, पुस्तकावर आयोजित करण्यात आलेल्या प्रस्तावित चर्चेवरून कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच मोठा वाद निर्माण झाला. विद्यापीठ प्रशासनाने शेवटच्या क्षणी कार्यक्रमासाठी निश्चित केलेले ठिकाण रद्द केल्यानंतर कॅम्पसमध्ये घोषणाबाजी, विरोध आणि दोन्ही बाजूंच्या विद्यार्थ्यांमध्ये आमनेसामनेची परिस्थिती निर्माण झाली. कार्यक्रमाच्या आयोजनावरून आधीपासूनच तणावाचे वातावरण होते. मात्र, कार्यक्रमाचे ठिकाण रद्द करण्याच्या निर्णयामुळे वाद आणखी वाढला. चर्चेचे समर्थन करणारे आणि विरोध करणारे विद्यार्थी यांनी वेगवेगळ्या घोषणा दिल्या. या दरम्यान परिस्थिती अनेक वेळा संघर्षासारखी बनताना दिसली.(Manifesto in support of JNUt Omar Khalid)
कार्यक्रमाच्या आयोजकांनी प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. कार्यक्रमासाठीचे ठिकाण शेवटच्या क्षणी रद्द करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शैक्षणिक चर्चेला रोखण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे, विद्यापीठ प्रशासनाच्या निर्णयावरून कॅम्पसमध्ये राजकीय आणि वैचारिक चर्चेलाही वेग आला. याच दिवशी पुस्तकावरील चर्चेदरम्यान ‘जेल के ताले टूटेंगे, सारे साथी छूटेंगे’ आणि ‘उमर खालिद को छोड़ दो’ अशा घोषणा देण्यात आल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उमर खालिद विरोधात जोरदार घोषणा दिल्या. दोन्ही विद्यार्थी संघटनांकडून झालेल्या घोषणाबाजीमुळे कार्यक्रमस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.(Manifesto in support of JNUt Omar Khalid)
विद्यापीठ प्रशासनाची नेमकी भूमिका काय?
ही चर्चा यापूर्वी स्कूल ऑफ सोशल सायन्सेस-१च्या सभागृहात आयोजित करण्यात येणार होती. मात्र, विद्यापीठाने सभागृहाचे बुकिंग रद्द केले. कार्यक्रमाबाबत आयोजकांकडून ‘पूर्ण माहिती’ देण्यात आली नव्हती, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. विद्यापीठाने म्हटले की, जेएनयू ही एक लोकशाहीवादी आणि विकेंद्रीकृत संस्था आहे. कार्यक्रमाची परवानगी स्कूल ऑफ सोशल सायन्सेसच्या अधिष्ठात्यांनी दिली होती आणि कार्यक्रम रद्द करण्याची कारवाईही त्यांनीच केली आहे. यानंतर जेएनयू विद्यार्थी संघटनेने घोषणा केली की, स्कूल ऑफ सोशल सायन्सेस-२ इमारतीबाहेर चर्चा आयोजित केली जाईल आणि मूळ ठिकाणाचे बुकिंग रद्द झाल्यामुळे कार्यक्रमावर कोणताही परिणाम होणार नाही.(Manifesto in support of JNUt Omar Khalid)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक