ठाणे : (Hyderabad Rapido Driver Ride Offer) रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्तींकडून मिळणाऱ्या राईडच्या ऑफरबाबत पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सिद्धेश्वरी सुगंध ऊर्फ ‘सिद्धी’ हिचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. हैदराबादमधील चारमिनार परिसरात तिच्यासोबत घडलेला एक प्रकार तिने शेअर केला आहे. कशा प्रकारे धर्मांध मुसलमान हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्याचे वेगवेगळे हाथकांडे वापरतात हे या व्हिडीओ मधून स्पष्ट झाले आहे. ही पहिली घटना नाही यापूर्वी कल्याण आणि मुलुंड परिसरात सुद्धा अशा घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे.(Hyderabad Rapido Driver Ride Offer)
सिद्धीच्या दाव्यानुसार, रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास चारमिनार परिसरात असताना एक व्यक्ती स्कूटरवरून तिच्याजवळ आला. त्याने आपले नाव मोहम्मद इरफान असल्याचे सांगितले आणि स्वतःला रॅपिडो चालक असल्याचे सांगत तिला राईडची ऑफर दिली. मात्र, त्याच्या स्कूटरला नंबर प्लेट नसल्याचे सिद्धीच्या निदर्शनास आले. त्यामुळे तिला संशय आला. सिद्धीने संबंधित व्यक्तीकडे तो रॅपिडो चालक असल्याचा पुरावा आणि अॅपवरील चालकाचे सक्रिय प्रोफाइल दाखवण्याची मागणी केली. मात्र, यावेळी कथित चालकाने सक्रिय ड्रायव्हर प्रोफाइल दाखवण्याऐवजी मोबाईलमध्ये प्ले स्टोअर उघडून रॅपिडो अॅप डाउनलोड करण्यास सुरुवात केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.(Hyderabad Rapido Driver Ride Offer)
‘तुम्ही आधीपासून रॅपिडो चालक असाल, तर अॅप डाउनलोड करण्याची गरज का?’ असा सवाल करत सिद्धीने संबंधित व्यक्तीला जाब विचारला. त्यानंतर या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ तिने रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. यावरून रात्रीच्या वेळी विशेषतः महिलांनी अनोळखी वाहनातून प्रवास करण्यापूर्वी चालकाची ओळख, वाहनाचा क्रमांक आणि संबंधित अॅपवरील चालकाचे प्रोफाइल तपासणे किती महत्त्वाचे आहे, याकडे या घटनेमुळे लक्ष वेधले गेले आहे.(Hyderabad Rapido Driver Ride Offer)
Hyderabad bigest muslim population of jihadis is in Hyderabad,,love jihad is done on road without any fear ,, Hindu kafir girl r trap in love jihad n molest in hydrabad in street n markets sahibabad is the bigest razakar area of hydrabad https://t.co/gr6stK8DqW
ऑनलाइन कॅब किंवा बाइक टॅक्सी बुक केल्यानंतर अॅपवर दिसणारा चालक, त्याचा फोटो आणि वाहनाचा क्रमांक प्रत्यक्ष वाहनाशी जुळतोय का, याची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच बुकिंग न केलेल्या वाहनचालकाने स्वतःहून राईडची ऑफर दिल्यास अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. सिद्धीने शेअर केलेल्या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर या घटनेची मोठी चर्चा सुरू झाली आहे. संबंधित व्यक्तीने नेमके काय सांगितले, त्याची अधिकृत ओळख काय आहे आणि या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.(Hyderabad Rapido Driver Ride Offer)
त्यामुळे व्हायरल व्हिडीओतील दाव्यांच्या आधारे अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. संबंधित व्यक्तीची बाजू आणि पोलिसांची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. मात्र, या घटनेने एक महत्त्वाचा संदेश नक्कीच दिला आहे—रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्तीने ‘कॅब किंवा रॅपिडो चालक’ म्हणून राईडची ऑफर दिली, तर केवळ त्याच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता चालकाची ओळख आणि वाहनाची माहिती तपासणे अत्यावश्यक आहे. एका छोट्याशा संशयाने सिद्धीने थांबून चौकशी केली; त्यामुळे हा व्हिडीओ आता महिलांच्या सुरक्षेबाबतच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.(Hyderabad Rapido Driver Ride Offer)
यापूर्वी मुंबई परिसरातही असाच प्रकार घडला होता. एका महिलेने ऑनलाईन बुकींग करून राईड बूक केली होती. मात्र तिला रिसिव्ह करण्यासाठी आलेला व्यक्ती ही दुसरीच होती. त्याने तिला फुस लावत सांगितले की, राईड माझीच बूक झाली आहे मात्र अॅपमध्ये तुम्हाला वेगळ्या व्यक्तीचे नाव दिसत असेल. अशी चूक होऊ शकते असा विचार करत महिलेने त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय केला. तोच तिने बूक केलेल्या राईडचा मूळ ड्रायव्हर तिथे आला आणि त्याने तिचे लक्ष वेधले. त्यामुळे सुरुवातीच्या जिहादी मुस्लिम ड्रायव्हरचा डाव तिच्या लक्षात आला. असे घडूनही संबंधित महिलेच्या पालकांनी / नातेवाईकांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात न घेता याप्रकाराकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पालकांची देखील अशा परिस्थितीत भूमिका महत्त्वाची आहे.(Hyderabad Rapido Driver Ride Offer)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक