मुंबई : (Dheeraj Pardeshi Ahilyanagar) अहिल्यानगरच्या मुकुंदनगर भागात धर्मांध मुस्लिमांच्या टोळक्याने केलेल्या माराहाणीत कट्टर हिंदुत्ववादी धीरज परदेशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आरोपींविरोधात कडक कारवाई करण्यात यावी आणि धीरजला न्याय मिळावा, या मागणीखातर धीरजचे पार्थिव तसेच ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सोमवारी धीरजच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीपूर्वी माळीवाडा येथील बारातोटी कारंजा येथे अंतिम दर्शनासाठी पार्थिव नेण्यात आले होते. नालेगाव येथील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी हजारोंच्या संख्येने जनसागर लोटल्याचे दिसून आले.
मुकुंदनगर भागातील दर्गादायरा कब्रस्तानात स्ट्रीट लाईटचे काम करत असताना मेहराज अस्लम सय्यद, सिराज असलम सय्यद, मुस्तकिम अस्लम सय्यद, युनूस शेख व अन्य २-३ धर्मांध मुस्लिमांनी धीरजवर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर उपचारादरम्यान धीरजचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या धीरज परदेशी यांच्या मृत्यूप्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.(Dheeraj Pardeshi Ahilyanagar)
त्याचबरोबर ग्रामपंचायतीने मुस्तकिम सय्यद, मेहराज सय्यद, सिराज सय्यद यांच्या नगरदेवळा येथील घरांबाबत अतिक्रमणाच्या नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांमध्ये संबंधित बांधकामे कथितरीत्या अनधिकृत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तींना बांधकामाची परवानगी आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तसे न केल्यास कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नोटिसमध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम ५२ आणि ५३ चा संदर्भ देण्यात आला असून ग्रामपंचायतीच्या मालमत्ता क्रमांक २३७४ आणि २५१७ शी संबंधित बांधकाम हटविण्याची कारवाई केली जाऊ शकते, असेही नमूद करण्यात आले आहे.(Dheeraj Pardeshi Ahilyanagar)
हल्लोखोरांना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे : देवेंद्र फडणवीस
सोमवारी रात्री अहिल्यानगरच्या डीएसपी चौकात हिंदू जनसमुदाय मोठ्या संख्येने जमला होता. धीरजचे पार्थिवही तिथेच होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धीरज यांचे कुटुंबीय व उपस्थित हिंदूंशी संवाद साधला. ते म्हणाले, "धीरज परदेशी यांची झालेली हत्या अत्यंत निंदनीय घटना असून आम्ही देखील याचा पूर्णतः निषेध करतो. कुठल्याही परिस्थितीत हल्लेखोरांना आम्ही सोडणार नाही. हल्लोखोरांना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे. विशेष सरकारी वकील आपण यासाठी देऊ, त्याचप्रमाणे उच्च न्यायालयास विनंती करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात कसे चालवता येईल त्यासाठी देखील प्रयत्न करू आणि कुठल्याही परिस्थितीत अशाप्रकारच्या प्रवृत्तींना ठेचल्याशिवाय सरकार थांबणार नाही." असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेत धीरजच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची विनंती उपस्थितांना केली. त्यानुसार मग अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.(Dheeraj Pardeshi Ahilyanagar)
गोपीचंद पडळकरांचा आक्रमक पवित्रा
डीएसपीचौकात उपस्थित हिंदूंना संबोधित करताना आमदार गोपीचंद पडळकर यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. यावर्षीची गणपतीची मिरवणूक याच परिसरातून निघायला हवी अशी भूमिका समस्त हिंदूची असली पाहिजे. धीरजचे निधन व्यर्थ जाता कामा नये. अहिल्यानगरातील कुठल्याही हिंदू भगिनीवर अशा जिहादी प्रवृत्तीच्या धर्मांधांची वाकडी नजर पडली तर त्यांचे डोळे काढण्याची धमक आपल्या हिंदू पोरांमध्ये असली पाहिजे, असे मत पडळकरांनी व्यक्त केले.(Dheeraj Pardeshi Ahilyanagar)
धीरज परदेशी यांची मुस्लिम धर्मांधांनी ठेचून हत्या केली. आणखी किती हिंदुत्ववादी सहकाऱ्यांना जिहादचे शिकार व्हावे लागणार आहे. कपाळावर टिळा लावयाय आणि हिंदुत्वाचे कार्य करतो म्हणून धीरला धर्मांधांनी मारले. हिंदूंना पुन्हा एकदा तिच विनंती आहे की, जागे व्हा! अशा जिहादी प्रवृत्तीच्या आरोपींचा नामोनिषाण वेळीच संपवला पाहिजे. त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवला पाहिजे. पुन्हा कुठल्या हिंदूकडे वाकडी नजर करण्याची यांची हिम्मत झाली नाही पाहिजे, अशी अद्दल यांना घडवण्याची वेळ आली आहे, अशी भावना संग्राम बापू भंडारे यांनी व्यक्त केली.(Dheeraj Pardeshi Ahilyanagar)
कपाळावरील भगव्या टिळ्याने धर्मांध थरथरले पाहिजेत!
माझा ढाण्या वाघ मला कायम म्हणायचा की, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. माझे रक्त भगवे आहे आणि तू माझी वाघीण आहेस. मी असो किंवा नसो, हिंदू धर्मासाठी आपल्याला कायम उभे राहायचे आहे. जिहादी प्रवृत्तीचे लांडगे पाठीमागूनच वार करतात. आज एक धीरज परदेशी गेला आहे. माझ्या नवऱ्याला न्याय मिळायलाच हवा. माझी प्रशासनाकडे मागणी आहे की, आरोपींचा एन्काऊंटर करा, अन्यथा त्यांना फाशीवर चढवा. हिंदुत्ववादी सरकारकडून नक्कीच न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. हिंदू धर्म रक्षणासाठी आज मी प्रतिज्ञा घेत आहे. कपाळावरील भगव्या टिळ्याने धर्मांध थरथरले पाहिजेत, इतकी ताकद हिंदूंची आता दिसायला हवी.(Dheeraj Pardeshi Ahilyanagar)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक