प्रा. दीपक धर यांना २०२६ चे प्रतिष्ठित 'डिराक पदक';सांख्यिकीय भौतिकशास्त्रातील योगदानाची जागतिक दखल

    11-Aug-2026   
Prof. Deepak Dhar Dirac Medal 2026
 
मुंबई : (Prof. Deepak Dhar Dirac Medal 2026) भारताचे नामवंत सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ प्रा. दीपक धर यांना २०२६ सालचा प्रतिष्ठित डिराक पदक देण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर थियोरेटिकल फिजिक्स (आयसीटीपी) ने ही घोषणा केली आहे. सांख्यिकीय भौतिकशास्त्राच्या क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. प्रा. दीपक धर यांच्यासोबत आणखी तीन नामवंत वैज्ञानिकांचीही या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये बर्नार्ड डेरिडा, मार्क मेझार्ड आणि हाइम सोमपोलिन्स्की यांचा समावेश आहे. या चारही वैज्ञानिकांनी सांख्यिकीय यांत्रिकी आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे.(Prof. Deepak Dhar Dirac Medal 2026)
 
डिराक पदक हा सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील अत्यंत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. महान भौतिकशास्त्रज्ञ पॉल डिराक यांच्या स्मरणार्थ १९८५ मध्ये या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. सैद्धांतिक भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात असामान्य आणि महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या वैज्ञानिकांना दरवर्षी हा सन्मान प्रदान केला जातो. या पदकाने सन्मानित झालेल्या वैज्ञानिकांमध्ये जगातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे. त्यामध्ये महान वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांचाही समावेश आहे. या पुरस्काराची प्रतिष्ठा यावरूनही लक्षात येते की, त्याचे अनेक मानकरी पुढे नोबेल पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. आयसीटीपीच्या मते, डिराक पदक हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील जगातील प्रमुख सन्मानांपैकी एक आहे.(Prof. Deepak Dhar Dirac Medal 2026)
 
प्रा. दीपक धर यांना २०२६चा डिराक पदक ‘सांख्यिकीय यांत्रिकी’ या क्षेत्रातील त्यांच्या संशोधनासाठी प्रदान करण्यात येणार आहे. भौतिकशास्त्राची ही अत्यंत महत्त्वाची शाखा आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, असंख्य कण किंवा घटक एकत्रितपणे कसे वागतात, याचा अभ्यास सांख्यिकीय यांत्रिकीमध्ये केला जातो. यामध्ये एखाद्या एका कणाच्या वर्तनाऐवजी कोट्यवधी कण एकत्र आल्यानंतर संपूर्ण प्रणाली कशी कार्य करते, याचा अभ्यास केला जातो. हे विज्ञान केवळ पुस्तके किंवा सैद्धांतिक अभ्यासापुरते मर्यादित नाही. आजच्या काळात इंटरनेट नेटवर्क, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) , शेअर बाजार यांसारख्या गुंतागुंतीच्या प्रणाली समजून घेण्यासाठीही या विज्ञानातील तत्त्वांचा उपयोग केला जातो.(Prof. Deepak Dhar Dirac Medal 2026)
 
प्रा. दीपक धर यांनी अशाच गुंतागुंतीच्या भौतिक प्रणालींचे आकलन करण्यासाठी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनात छोट्या आणि सामान्य घटनांमधून अचानक मोठ्या आणि गुंतागुंतीच्या घटना कशा निर्माण होतात, याचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यांच्या संशोधनाचा महत्त्वाचा भाग ‘सेल्फ-ऑर्गनाइज्ड क्रिटिकलिटी’ आणि त्याच्याशी संबंधित गणितीय प्रारूपांवर आधारित आहे. या संशोधनामुळे त्यांचे नाव जगातील आघाडीच्या वैज्ञानिकांमध्ये समाविष्ट झाले आहे.(Prof. Deepak Dhar Dirac Medal 2026)
 
बोल्ट्झमान पदक मिळवणारे भारतातील पहिले वैज्ञानिक
 
२०२६चा डिराक पदक हा प्रा. दीपक धर यांच्या कारकिर्दीतील पहिला मोठा आंतरराष्ट्रीय सन्मान नाही. यापूर्वी २०२२ मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील आणखी एक प्रतिष्ठित पुरस्कार ‘बोल्ट्झमान पदक’ प्रदान करण्यात आले होते. हा सन्मान मिळवणारे ते भारतातील पहिले वैज्ञानिक ठरले. सांख्यिकीय भौतिकशास्त्राच्या क्षेत्रातील हा अत्यंत प्रतिष्ठित सन्मान मानला जातो. हा ऐतिहासिक सन्मान मिळाल्यानंतर प्रा. दीपक धर यांनी अत्यंत नम्र प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, ते हे पदक मिळवणारे पहिले भारतीय असले तरी याचा अर्थ या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे ते भारतातील पहिले वैज्ञानिक आहेत, असा होत नाही. त्यांच्या या भूमिकेतून त्यांनी आपल्या यशाकडे भारतातील विज्ञान आणि संशोधनाच्या दीर्घ परंपरेचा एक भाग म्हणून पाहिल्याचे स्पष्ट होते.(Prof. Deepak Dhar Dirac Medal 2026)
 
२०२३ मध्ये देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मभूषण’
 
बोल्ट्झमान पदक मिळाल्यानंतर पुढच्याच वर्षी, म्हणजे २०२३ मध्ये भारत सरकारने प्रा. दीपक धर यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मभूषण’ प्रदान केला. विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला. प्रा. धर यांना यापूर्वीही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. १९८३ मध्ये इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचे यंग सायंटिस्ट मेडल, तर १९९१ मध्ये शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार त्यांना मिळाला.
 
यानंतर १९९३ मध्ये आयसीटीपीचा जे. रॉबर्ट श्रिफर पुरस्कार, २००१ मध्ये सत्येंद्रनाथ बोस पदक आणि २००२ मध्ये थर्ड वर्ल्ड अकादमी ऑफ सायन्सेस पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना इंडियन अकादमी ऑफ सायन्सेस, नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेस आणि टीडब्लूएएस यांसारख्या प्रमुख वैज्ञानिक संस्थांचे फेलो म्हणूनही निवडण्यात आले. विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी २००७ मध्ये प्रतिष्ठित जे. सी. बोस नॅशनल फेलोशिपही त्यांना मिळाली.(Prof. Deepak Dhar Dirac Medal 2026)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर