पुणे-मुंबई मार्गिका राहणार बुधवारी तीन तास बंद; जाणून घ्या सविस्तर काय असणार कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक बदल?


Connecting Link Transport change
 
मुंबई : (connecting Link Transport change) यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’च्या पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर बुधवारी (दि. १२ ऑगस्ट) देखभाल दुरुस्ती आणि मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी १२ ते ३ या कालावधीत या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
 
या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी सर्व वाहने जुन्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घाट मार्गातून मुंबईच्या दिशेने वळविण्यात येणार आहेत. दरम्यान, कनेक्टिंग लिंकवरून मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे.(connecting Link Transport change)
 
वाहनचालकांनी नियोजित वेळेत पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक बदलाच्या कालावधीत काही अडचण आल्यास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी ९८२२४९८२२४ किंवा महामार्ग पोलीस विभागाशी ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.(connecting Link Transport change)
 
वाहनचालकांनी लक्षात ठेवावे
 
दिनांक : १२ ऑगस्ट २०२६
वेळ : दुपारी १२ ते ३
बंद मार्गिका : पुणे → मुंबई
पर्यायी मार्ग : जुना मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, घाट मार्ग
मुंबई → पुणे मार्गिका : सुरू राहणार
देखभाल दुरुस्ती व मॉक ड्रिल : नियोजित
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर