मुंबई: (Ahilyanagar Dheeraj Pardeshi Murder) कपाळाला भगवा टिळा लावल्याच्या रागातून धर्मांध मुस्लिमांनी हिंदू तरुणाची क्रूर हत्या केल्याची संतापजनक घटना अहिल्यानगरात घडली आहे. यामुळे हिंदू समाजात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. याप्रकरणी सहा धर्मांध मुस्लिमांना पोलिसांनी अटक केली आहे. "त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवावा, तसेच त्यांना फाशीची शिक्षा द्यावी,” अशी मागणी मृत तरुणाच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.
अहिल्यानगरच्या मुकुंदनगर भागात धर्मांध मुस्लिमांच्या टोळयाने दि. ७ ऑगस्ट रोजी धीरज परदेशी नावाच्या तरुणावर प्राणघातक हल्ला चढवला. अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागातील ठेकेदाराकडे तो ‘हेल्पर’ म्हणून काम करत होता.(Ahilyanagar Dheeraj Pardeshi Murder)
महापालिकेचा वायरमन युनूस शेख याच्या सांगण्यावरून दर्गादायरा कब्रस्तानात स्ट्रीट लाईटचे काम करण्यासाठी धीरजला बोलावून घेण्यात आले. कामासाठी तिथे गेले असता धीरजने कपाळावर भगव्या रंगाचा टिळा लावला असल्याने या मुस्लीम टोळयाने त्याच्यावर हल्ला चढवला. या टोळक्याने धीरजला लाकडी बॅट आणि लोखंडी पाईपने जबर मारहाण करण्यात आली.(Ahilyanagar Dheeraj Pardeshi Murder)
या प्रकारानंतर रक्तबंबाळ अवस्थेत जखमी धीरजला सोडून मारहाणा करणार्या जिहादी टोळक्याने तेथून पळ काढला. त्यानंतर धीरजला तातडीने आधी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तिथे प्राथमिक तपास करून डॉटरांनी पुढील उपचासाठी दुसर्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्याच्यावर उपचार सुरु होते. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर जखमी धीरज परदेशीची प्राणज्योत रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी मालवली.(Ahilyanagar Dheeraj Pardeshi Murder)
या घटनेमुळे संतापलेल्या ‘सकल हिंदू समाजा’च्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलबाहेर ठिय्या दिला. ‘शहर बंद’ची हाक दिली. बाजारपेठेतील दुकाने तातडीने बंद करण्यात आली. महापालिका कर्मचारी संघटनेनेदेखील बेमुदत संप जाहीर केला. त्यानंतर पोलिसांनी सहा मुस्लीम आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये महापालिका वायरमन युनूस शेख आणि त्याच्या अन्य दोन सहकार्याचा समावेश आहे. शिवाय मेहराज अस्लम सय्यद, सिराज अस्लम सय्यद, मुस्तकिम अस्लम सय्यद या तिघांना हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे.(Ahilyanagar Dheeraj Pardeshi Murder)
ज्या कब्रस्तानात मारले, तिथेच अंत्यविधी करणार; पत्नीचा पवित्रा
"कपाळाला भगव्या रंगाचे गंध लावल्यामुळेच धीरजवर या धर्मांध मुस्लिमांनी प्राणघातक हल्ला केला,” असा आरोप मृत धीरजच्या पत्नीने केला आहे. "माझ्या नवर्याला ज्या कब्रस्तानात नेऊन मारले, त्याच ठिकाणी पतीचे अंत्यविधी करणार,” असा आक्रमक पवित्रा धीरजच्या पत्नीने घेतला आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.(Ahilyanagar Dheeraj Pardeshi Murder)
मनपा कर्मचारी बेमुदत संपावर
महापालिका कर्मचारी संघटनेने या हत्येच्या घटनेचा निषेध करत बेमुदत संपाचा इशारा दिला. मुकुंदनगर परिसरात काम करणार्या कर्मचार्यांना संरक्षण मिळेपर्यंत तेथील नागरी सुविधा बंद ठेवण्याचा, तसेच हल्ल्यातील सर्व आरोपींना अटक होईपर्यंत मनपाचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र सारसर, सरचिटणीस आनंदराव वायकर व बाबासाहेब मुदगल यांनी जाहीर केला.(Ahilyanagar Dheeraj Pardeshi Murder)
दरम्यान, आ. संग्राम जगताप यांनी या प्रकरणी पोलिसांच्या तपासावरच प्रश्न उपस्थित केले. "जुन्या वादाचे कारण पुढे करून पोलीस जाणीवपूर्वक या प्रकरणाच्या तपासात दिशाभूल करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. धीरजच्या कुटुंबाच्या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. (Ahilyanagar Dheeraj Pardeshi Murder)
सखोल तपास सुरू : पोलीस अधीक्षक
यामुळे अहिल्यानगरमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. याप्रकरणी "नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता पाळावी,” असे आवाहन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. "या प्रकरणाचा सखोल पोलीस तपास वेगाने सुरू आहे,” अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.(Ahilyanagar Dheeraj Pardeshi Murder)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक