तुर्भे येथे सिडकोची धडक कारवाई: ४,०६० चौ. मी. जागेवरील अनधिकृत आरएमसी प्लांट भुईसपाट

​सार्वजनिक मालमत्तेवरील अतिक्रमांविरुद्ध सिडको आक्रमक:​कोणतीही परवानगी न घेता उभारला होता प्रकल्प

    10-Aug-2026


Turbhe Unauthorized RMC Plant
 
नवी मुंबई(Turbhe Unauthorized RMC Plant):सर्वसामान्यांच्या हक्काच्या जमिनी आणि सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर रोखण्यासाठी सिडको महामंडळाने पुन्हा एकदा कडक भूमिका घेतली आहे. तुर्भे नोड क्षेत्रातील मौजे बोनसरी येथील सर्व्हे नंबर २०३ मधील तब्बल ४,०६० वर्ग मीटर जागेवर विनापरवाना उभारण्यात आलेला अनधिकृत आरएमसी (रेडी मिक्स कंक्रीट) प्लांट ६ ऑगस्ट रोजी सिडकोच्या अनधिकृत बांधकामे विभागाने निष्कासित केला.(Turbhe Unauthorized RMC Plant)
 
​शहराचा नियोजित विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सिडकोकडून अशा बेकायदेशीर बांधकामांवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. संबंधित आरएमसी प्लांट मालकाने सिडको महामंडळ किंवा कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी न घेता ही जागा बळकावली होती. वाढत्या अनधिकृत उद्योगांमुळे स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास आणि सार्वजनिक जमिनीचा होणारा अपहार लक्षात घेऊन ही धडक कारवाई करण्यात आली.(Turbhe Unauthorized RMC Plant)
 
​सदर मोहीम . मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार आणि मुख्य नियंत्रक (अनधिकृत बांधकामे) यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. हे अतिक्रमण हटवण्यासाठी १ पोकलेन machine, ३ जीप आणि १० कामगारांच्या मदतीने संपूर्ण प्लांट भुईसपाट करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिडको अतिक्रमण विभाग, स्थानिक पोलीस पथक, सिडको सुरक्षा पथक, महाराष्ट्र सुरक्षा मंडळ आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही कामगिरी पार पाडली.(Turbhe Unauthorized RMC Plant)
 
शहरात विनापरवाना चालणारे आरएमसी प्लांट केवळ जमिनींवर अतिक्रमण करत नाहीत, तर धूळ आणि प्रदूषणामुळे आसपासच्या रहिवाशांच्या आरोग्यालाही धोका निर्माण करतात. कायद्याचे उल्लंघन करून स्वतःचा फायदा उठवणाऱ्या अशा व्यावसायिकांवर झालेली ही कारवाई इतर अतिक्रमणधारकांसाठी स्पष्ट इशारा आहे. सार्वजनिक जागांचा वापर नागरिकांच्या सोयीसुविधांसाठीच व्हावा, हाच या कारवाईमागील मुख्य सामाजिक उद्देश आहे.(Turbhe Unauthorized RMC Plant) 
 
 
 
 




संबंधित मजकूर