'हर घर तिरंगा' उपक्रमातंर्गत तिरंगा रॅलीस सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

"हर घर तिरंगा" उपक्रमातंर्गत तिरंगा रॅलीस सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    10-Aug-2026
Thane Har Ghar Tricolor Cycle Rally

 
ठाणे,(Thane Har Ghar Tricolor Cycle Rally):स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) मोहिम 2026 उपक्रमांतर्गत ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकलप्रेमी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायकल तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत सायकलप्रेमींसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तिरंगा फडकवत देशभक्तीचा संदेश दिला.(Thane Har Ghar Tricolor Cycle Rally)
 
ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते रॅलीला झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त दीपक झिंजाड आणि उपायुक्त मीनल पालांडे, आम्ही सायकलप्रेमी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांच्यासह महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी, सायकलप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Thane Har Ghar Tricolor Cycle Rally)
 
रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सायकलस्वारांनी आपल्या सायकलवर तिरंगा ध्वज लावून तसेच हातात तिरंगा घेऊन उत्साहात सहभाग घेतला. ‘हर घर तिरंगा’चा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच देशभक्ती, एकता आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.(Thane Har Ghar Tricolor Cycle Rally)
 
महानगरपालिका मुख्यालयापासून सुरू झालेली ही सायकल रॅली आराधना सिनेमा, गजानन महाराज मठ मार्ग, पु. ना. गाडगीळ, तलावपाळी या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत राम गणेश गडकरी रंगायतन येथे पोहोचली. या संपूर्ण मार्गावर तिरंगा घेऊन सायकलस्वारांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.(Thane Har Ghar Tricolor Cycle Rally)
 
‘हर घर तिरंगा’ उपक्रम केवळ घराघरांत तिरंगा फडकविण्यापुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करणारा ठरावा, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या सायकल तिरंगा रॅलीमधून राष्ट्रीय एकात्मता आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.(Thane Har Ghar Tricolor Cycle Rally)
 
सायकलचा वापर वाढविणे, आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करणे आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे, यासोबतच राष्ट्रीय सणांमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचा संदेशही या रॅलीतून देण्यात आला. रॅलीच्या निमित्ताने ठाणे शहरात देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकलप्रेमी फाऊंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.(Thane Har Ghar Tricolor Cycle Rally)
 
 




संबंधित मजकूर