मुंबई(Samsung Galaxy Z Series Delivery ) : सॅमसंगने आज भारतातील डिवाईसेस प्री-बुक केलेल्या ग्राहकांसाठी बहुप्रतिक्षित नवीन फोल्डेबल स्मार्टफोन्स गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप८ यांच्या वेळेपूर्वी डिलिव्हरी सुरू करण्याची घोषणा केली. भारतात २२ जुलै रोजी झालेल्या लाँचच्या अवघ्या ७२ तासांच्या आत २,७१,००० हून अधिक प्री-ऑर्डर्स मिळवत गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप८ ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. याउलट, मागील पिढीच्या गॅलेक्सी झेड फोल्ड७ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप७ साठी समान संख्येने प्री-ऑर्डर्स मिळवण्यासाठी १५ दिवस लागले होते, ज्यामधून फोल्डेबल तंत्रज्ञानाचा मुख्य प्रवाहात सातत्याने होत असलेला स्वीकार दिसून येतो. ग्राहकांनी प्री-ऑर्डरवर १०,००० रुपयांची अपग्रेड ऑफर, किंवा ९,००० रुपयांपर्यंत बँक/युपीआय कॅशबॅक, किंवा शून्य टक्के डाऊन पेमेंट* सह ३० महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयचा मिळू शकेल.(Samsung Galaxy Z Series Delivery )
सॅमसंगने आपल्या नवीन गॅलक्सी झेड सिरीजमध्ये तंत्रज्ञान, डिझाइन आणि एआयचा उत्कृष्ट मेळ साधला आहे. या मालिकेतील गॅलक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा हा ८-इंच मुख्य स्क्रीन, ४.१ मिमी जाडी आणि २१५ ग्रॅम वजनासह सॅमसंगचा आजवरचा सर्वात स्लिम आणि शक्तिशाली फोल्डेबल फोन आहे; यात २००एमपी मुख्य + ५०एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा, ८के व्हिडिओ रेकॉर्डिंग, स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ प्रोसेसर आणि ४५व्हाट्स फास्ट चार्जिंगसह ५००० एमएएच बॅटरी दिली आहे. तर गॅलक्सी झेड फोल्ड८ हा आतापर्यंतचा सर्वात हलका (२०१ ग्रॅम) फोल्ड फोन असून, यात १०:१६ कव्हर स्क्रीन, ३००० निट्स ब्राइटनेस असणारा ४:३ मुख्य डिस्प्ले, फ्लेक्स टायटॅनियममुळे कमी दिसणारी क्रीझ, ड्युअल ५०एमपी कॅमेरा आणि ४८०० एमएएच बॅटरी मिळते. तसेच गॅलक्सी झेड फ्लिप८ हा ६.१ मिमी जाडी व १८० ग्रॅम वजनाचा सर्वात स्लिम फ्लिप फोन आहे, ज्याच्या 'फ्लेक्सविंडो' कव्हर स्क्रीनवर थेट जेमिनी एआय आणि ॲप्स वापरता येतात, आणि यात ५०एमपी प्रोव्हिज्युअल कॅमेऱ्यासह फ्लेक्स मोड दिला आहे. याशिवाय, संपूर्ण सिरीजमध्ये 'नाऊ ब्रीफ', 'नाऊ नज' व ४९ ॲप्सवर काम करणारे ऑटोमेशन यांसारखे गॅलक्सी एआय फीचर्स समाविष्ट आहेत, तर सुरक्षेसाठी सॅमसंग नॉक्स, नॉक्स वॉल्ट आणि वन युआय ९ चा प्रायव्हसी डॅशबोर्ड देण्यात आला आहे.(Samsung Galaxy Z Series Delivery )