मुंबई : (Western Railway) आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर विविध ठिकाणी लागोपाठ तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. वसई रोड, दादर आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान पॉईंट फेल्युअर (Point Failures) झाल्यामुळे गाड्यांच्या फेऱ्या खोळंबल्या असून ऐन गर्दीच्या वेळी नोकरदारांचे मोठे हाल होत आहेत.
वसई रोड : पहाटे ४:४६ वाजता 'दिवा डाऊन/अप' जलद मार्गावर तांत्रिक बिघाड झाला. तातडीने रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पॉईंट क्लॅम्पिंगचे काम सुरू केले, ज्यामुळे अप जलद मार्गावरील गाड्या खोळंबल्या. (Western Railway)
दादर : सकाळी १०:१० च्या सुमारास अप आणि डाऊन जलद मार्गावरील पॉईंट १४३/१४४ रिव्हर्सवरून नॉर्मल होण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली, ज्यामुळे या मार्गावरील वाहतूक मंदावली. (Western Railway)
गोरेगाव : सकाळी १०:२२ च्या सुमारास गोरेगाव स्थानकातील अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील पॉईंट १२७/१२८ आणि १२९/१३० मध्ये बिघाड झाला, ज्यामुळे हार्बर लाईनवरील लोकल सेवा विस्कळीत झाली. (Western Railway)
रेल्वे प्रशासन आणि तांत्रिक टीमकडून हे बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. (Western Railway)