मुंबई(Gen Z Gen Alpha): कोणतीही गोष्ट जशी आहे तशी न स्वीकारता प्रश्न विचारणे हा पाश्चात्य विचार नसून तो अस्सल भारतीय विचार असून अर्जुनाने भगवान कृष्णाला प्रश्नच विचारला नसता तर 'ग्रंथांचा ग्रंथ' असलेली भगवत गीता निर्माण झाली नसती असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले.(Gen Z Gen Alpha)
जेन-झी व जेन-अल्फा या विद्यार्थी व युवकांच्या मुंबईत सुरु असलेल्या ४ दिवसांच्या 'आयमीन' चॅम्पियनशिप परिषदेच्या सांगता सत्राला संबोधित करताना राज्यपाल बोलत होते. परिषदेचे आयोजन इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाइट नेशन्स (IIMUN) संस्थेने केले. या परिषदेत देशाच्या १०० शहरांतील तसेच पाच इतर देशांमधील २,१०० युवक सहभागी झाले.(Gen Z Gen Alpha)
भारतीय पुराणात अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा व मंदोदरी यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या काळातील त्या बंडखोर होत्या. त्यांनी सरधोपट मार्ग निवडला नाही तर शक्य तेथे प्रस्थापितांना सवाल केला. सावित्रीने तर मृत्यूची देवता यमराजाला सवाल केला असे राज्यपालांनी सांगितले.(Gen Z Gen Alpha)
उपनिषदांमधील 'नेति नेति' या उद्गारामुळे सत्यान्वेषण नवनव्या मार्गाने झाले. ही संकल्पना प्रश्न विचारणाऱ्या चौकस बुद्धीला चालना देणारी आहे असे राज्यपालांनी सांगितले.(Gen Z Gen Alpha)
ठराविक नियमांच्या चौकटीतच स्वातंत्र्याचा खरा उपभोग घेता येतो असे सांगताना एखाद्या रागातील स्वरांची चौकट पाळली तर त्या चौकटीत वेगवेगळे गायक नवनवीन पद्धतीने गाऊ शकतात, असे राज्यपालांनी सांगितले. गाण्याचे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी ठराविक रागाची चौकट मात्र कसोशीने पाळली पाहिजे असे त्यांनी सांगितले.(Gen Z Gen Alpha)
आयआयएमयूएनचे संस्थापक ऋषभ शाह यांनी आपल्या प्रास्ताविकात युवकांची परिषद गेल्या १५ वर्षांपासून काम करीत असल्याचे सांगितले. आज जेन झी व जेन अल्फा यांच्या विचारांना लोक गांभीर्याने ऐकत आहेत. देश आणि जग कोणत्या दिशेने जायचे हे या पिढ्या ठरवतील असे शाह यांनी सांगितले.(Gen Z Gen Alpha)
परिषदेचे मार्गदर्शक अभिषेक धवन, अंजनी रायपत तसेच स्तुती तक देखील यावेळी उपस्थित होते.