आरोग्य भारती प्रांत अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

    10-Aug-2026   
 
Arogya Bharati Konkan Province Study Class
 
 
 मुंबई (Arogya Bharati Konkan Province Study Class) : आरोग्य भारती, कोकण प्रांत आयोजित प्रांत अभ्यासवर्ग रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी घाटकोपर येथील पुणे विद्यार्थी गृह महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या अभ्यासवर्गास कोकण प्रांतातील १५ जिल्ह्यांमधून ७० पुरुष व ३१ महिला असे एकूण १०१ कार्यकर्ते उपस्थित होते.(Arogya Bharati Konkan Province Study Class)
 
अभ्यासवर्गाची सुरुवात गजानन हेगडे (कोकण प्रांत संघटन सचिव) यांच्या धन्वंतरी स्तवनाने झाली. शेषराज कुरपटवार (कोकण प्रांत सचिव) यांनी प्रास्ताविकात गेल्या वर्षभराचा आढावा सांगितला. आरोग्य भारती कोकण प्रांत विविध सेवा क्षेत्रात कार्य करत आहे, तसेच जागतिक योग दिनाच्या माध्यमातून १०८ ठिकाणी १०,हजार हून अधिक लोकांनी योग केला असल्याची माहिती त्यांनी दिली. भूमिका मांडताना आरोग्य भारतीचे अखिल भारतीय संघटन सचिव डॉ अशोक कुमार वार्ष्णेय यांनी प्रांत अभ्यासवर्गाची आवश्यकता व आरोग्य भारतीचा अखिल भारतीय कार्यविस्तार या विषयी सांगितले.(Arogya Bharati Konkan Province Study Class)
 
उद्घाटन सत्रास अस्थिरोगतज्ज्ञ व शल्यचिकित्सक डॉ. मोहित शेटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करणे हेदेखील एक प्रकारची सेवा आहे. तंत्रज्ञानाचा विकास उपचार करण्यास सक्षम ठरेल; मात्र मानवी करुणेला तंत्रज्ञान पर्याय ठरू शकत नाही. मानवी करुणा ही केवळ मानवी संपर्क आणि सहानुभूतीच्या माध्यमातूनच शक्य आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर डॉ शुभा राऊळ या देखील उपस्थित होत्या. या सत्राचे संचालन आशिष मंडलोई (कोकण प्रांत सह सचिव) यांनी केले.(Arogya Bharati Konkan Province Study Class)
 
अभ्यासवर्गाच्या पहिल्या सत्रात आरोग्य भारतीचे अखिल भारतीय विद्यालय स्वास्थ्य कार्यक्रम प्रमुख डॉ. उमेश तागडे यांनी विद्यालय स्वास्थ्य कार्यक्रम आयाम या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यालयात काय कार्यक्रम आपण घेऊ शकतो, त्या मागची योजना व क्रियान्वयन या विषयी त्यांनी माहिती सांगितली. त्यानंतर आरोग्य भारती कोकण प्रांताचे सहसचिव डॉ. यतिराज कऱ्हाडे यांनी प्रभावी संघटन व कार्ययोजना या विषयावर मार्गदर्शन केले. प्रभावी संघटन उभारण्यासाठी का आणि कसे कार्य करावे, कार्याचे नियोजन कशा पद्धतीने करावे तसेच नियोजनबद्ध पद्धतीने उद्दिष्टपूर्ती कशी साध्य करावी, याबाबत त्यांनी सविस्तर विवेचन केले. या दोन्ही विषयांवर डॉ अशोक कुमार जी यांनी नंतर मार्गदर्शन केले. या सत्राचे संचालन डॉ ओमप्रकाश गजरे (घाटकोपर विभाग संयोजक) यांनी केले.(Arogya Bharati Konkan Province Study Class)
 
दुसऱ्या सत्रात कोकण प्रांत महिला प्रमुख राजश्री वोरा यांनी संघटनेमध्ये महिलांचा सहभाग व संख्या वाढविणे तसेच महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्यासाठी करावयाच्या कार्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. रीता श्रीवास्तव (अखिल भारतीय महिला प्रमुख) तसेच डॉ. मधुरा कुलकर्णी (अखिल भारतीय गर्भसंस्कार आयाम प्रमुख) यांनी मार्गदर्शन करताना संपूर्ण देशातील महिला कार्य या विषयी माहिती दिली. तसेच महिला स्वस्थ असतील तरच परिवार स्वस्थ बनेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यानंतर कोकण प्रांत उपाध्यक्ष डॉ. वैभव देवगिरकर यांनी आरोग्य मित्र संकल्पना आणि आरोग्य मित्रांनी करावयाच्या विविध कार्यांविषयी मार्गदर्शन केले. प्रथमोपचार, योग-सूर्यनमस्कार, घरेलू उपचार आदि आयामांविषयी माहिती ही आरोग्य मित्राला हवी, असे त्यांनी सांगितले. डॉ महेश जी हारीत (कोकण प्रांत सदस्य) यांनी आरोग्य मित्र आयामाचे महत्त्व अधोरेखित केले. श्यामल मुणगेकर (कोकण प्रांत महिला सदस्य) यांनी या सत्राचे संचालन केले.(Arogya Bharati Konkan Province Study Class)
 
नियोजनात्मक सत्रामध्ये कोकण प्रांतातील २४ जिल्ह्यांच्या वार्षिक कार्यनियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी वर्षातील विविध उपक्रम, संघटनात्मक विस्तार आणि आरोग्यविषयक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. या सत्रात कोकण प्रांत सचिव शेषराज कुरपटवार यांनी मार्गदर्शन केले.(Arogya Bharati Konkan Province Study Class)
 
अभ्यासवर्गाच्या समारोप सत्रास घाटकोपर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एकनाथ येवले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी “रोगांचे प्रतिबंधन करणे, हीच मुख्य चिकित्सा आहे” असे सांगत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. आरोग्य भारतीचे अखिल भारतीय संघटन सचिव डॉ अशोक कुमार वार्ष्णेय यांनी समारोप सत्रातील आपल्या पाथेयातून कार्यकर्त्यांनी अध्ययनशील वृत्ती विकसित करावी, तसेच आपण करीत असलेल्या कार्याचे वेळोवेळी आत्मपरीक्षण व व्यक्तिगत मूल्यमापन करावे, असे आवाहन केले. या अभ्यासवर्गास दिगंबर जी मोरे (घाटकोपर भाग कार्यवाह) तसेच सतीश झा (घाटकोपर विभाग प्रचारक) यांची सुद्धा उपस्थिती लाभली.(Arogya Bharati Konkan Province Study Class)
 
विविध आयामांचे कार्य, प्रभावी संघटन, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि आगामी वर्षाचे नियोजन या सर्व बाबींचा समन्वय साधणारा हा अभ्यासवर्ग कार्यकर्त्यांसाठी ज्ञानवर्धक, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरला. संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी या अभ्यासवर्गातून कार्यकर्त्यांना नवी दिशा व ऊर्जा मिळाली.(Arogya Bharati Konkan Province Study Class) 
 
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर