संसदेतील संतवेशातील आंदोलनावरून राहुल गांधींसह अन्य नेत्यांविरुद्ध एफआयआर

संत समाजाच्या प्रतिनिधीमंडळाकडून तक्रार दाखल

    01-Aug-2026   
Rahul Gandhi FIR
 
मुंबई : (Rahul Gandhi FIR) संसद परिसरात संतांची वेशभूषा परिधान करून करण्यात आलेल्या राजकीय आंदोलनाचा विरोध आता काशीपर्यंत पोहोचला आहे. पातालपुरी मठाचे पीठाधीश्वर महंत बालक दास यांच्या नेतृत्वाखाली संत समाजाच्या प्रतिनिधीमंडळाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्यात खासदार पप्पू यादव, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, डिंपल यादव, अवधेश प्रसाद तसेच आंदोलनात सहभागी इतर नेत्यांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे.(Rahul Gandhi FIR)
 
शनिवारी संत समाजाचे प्रतिनिधीमंडळ कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी आरोप केला की, संसदेत संतांचा वेश धारण करून राम मंदिराच्या चढाव्याच्या मुद्द्यावर राजकीय आंदोलन करण्यात आले. त्यामुळे संत समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असून, कोट्यवधी सनातन धर्मीयांच्या धार्मिक भावना देखील दुखावल्या गेल्या आहेत.(Rahul Gandhi FIR)
 
महंत बालक दास म्हणाले की, लोकशाहीत आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, त्यासाठी संतांची वेशभूषा आणि धार्मिक परंपरांचा राजकीय मंचावर वापर करणे अयोग्य आणि निषेधार्ह आहे. संसदेसारख्या सर्वोच्च लोकशाही मंचावर संतांच्या स्वरूपाचा वापर करून संपूर्ण संत समाजाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.(Rahul Gandhi FIR)
तक्रारीत खासदार पप्पू यादव, राहुल गांधी, डिंपल यादव, अवधेश प्रसाद तसेच आंदोलनात सहभागी इतर व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. धार्मिक प्रतीके आणि संत परंपरेचा राजकीय हेतूंसाठी गैरवापर कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही, असे संत समाजाने स्पष्ट केले.(Rahul Gandhi FIR)
 
तक्रार दाखल करण्याच्या वेळी मोठ्या संख्येने साधू-संत आणि त्यांचे समर्थक उपस्थित होते. या प्रकरणाची पुष्टी करताना काशी विभागाचे डीसीपी गौरव बंसवाल यांनी सांगितले की, संत समाजाकडून प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्यात संबंधित कायदेशीर कलमांनुसार एफआयआर नोंदविण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, तपासाच्या निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.(Rahul Gandhi FIR)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर