प्रतीक्षा नगरात दीड वर्षांत उभारणार सहकार भवन

प्रवीण दरेकरांनी फुलविण्याचे काम केले : शिवेंद्रसिंहराजे भोसले

Pratiksha Nagar
 
मुंबई : (Pratiksha Nagar) भारतीय राष्ट्रीय सहकारी संघच्या संचालकपदी आमदार प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल बृहन्मुंबई मजूर चळवळीच्या वतीने दादर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झालेल्या या सोहळ्यात सहकार चळवळीच्या भविष्यासंदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका मांडण्यात आली.
 
यावेळी बोलताना मंत्री भोसले म्हणाले,"मुंबई बँकेच्या माध्यमातून प्रवीण दरेकर यांनी केवळ सहकार जिवंत ठेवला नाही, तर तो फुलविण्याचे काम केले आहे. सहकार आता बदलत असून त्याच्या कायद्यातही बदल होण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील सहकाराचे यश देशपातळीवर पोहोचविण्याची जबाबदारी दरेकर यांच्यावर आली असून हे बदल त्यांच्या माध्यमातून दिल्लीतून घडावेत."देशाला सहकाराची दिशा महाराष्ट्राने दिली असून सामान्य, शेतकरी व कामगार कुटुंबातील युवकांना सहकाराच्या माध्यमातून सक्षम करण्याचे मॉडेल देशासमोर ठेवण्याची क्षमता दरेकर यांच्यात असल्याचेही त्यांनी सांगितले. (Pratiksha Nagar)
 
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मजूर सहकारी संस्थांना पूर्ण सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही देताना भोसले म्हणाले की, जिल्हा बँका, विकास सोसायट्या आणि मजूर संस्थांचे प्रश्न सोडविण्यास सरकार कटिबद्ध आहे. तसेच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रात धाडसी निर्णय घेतले गेल्याचा उल्लेखही त्यांनी केला. (Pratiksha Nagar)
 
सत्काराला उत्तर देताना आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, "हा माझा नव्हे, तर सहकार चळवळ उभी करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांचा सत्कार आहे. गेली २५ वर्षे मजूर सहकारी संस्था आणि सहकार चळवळीला बळ देण्यासाठी काम केले. अनेक संकटे आली, आरोप झाले; मात्र मजूर चळवळीशी असलेली माझी नाळ कधी तुटू दिली नाही." (Pratiksha Nagar)
 
मुंबई बँकेच्या प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, १,२०० कोटी रुपयांच्या व्यवसायाची मुंबई बँक आज १६ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. स्वयं पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून मराठी माणसाला मोठे घर मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत त्यांनी प्रतीक्षा नगर येथे दीड वर्षांत अत्याधुनिक 'सहकार भवन' उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कामांमध्ये मजूर सहकारी संस्थांना ३३ टक्के प्राधान्य मिळावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Pratiksha Nagar)
 
यावेळी मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, माजी खासदार सुधीर सावंत, महाराष्ट्र राज्य मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष संजीव कुसाळकर, नगरसेवक प्रकाश दरेकर, भास्कर राऊत, मुंबई बँकेचे संचालक आनंदराव गोळे, विठ्ठलराव भोसले, विनोद बोरसे, नितीन बनकर, शशिकांत पाध्ये, बाळकृष्ण साळुंखे, प्रभू बिराजदार, सुनील बांबुळकर, अरुण शंकर, दादा इंगळे, शकुंतला वाघ, मीनाक्षी उजाळ, प्रिया मर्गज, रामचंद्र राजपूत, वीरेंद्र शंकर यांच्यासह मुंबई-कोकण विभागातील विविध मजूर सहकारी संघांचे पदाधिकारी, संचालक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Pratiksha Nagar)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर