विशाखापट्टणम : (Andhra Pradesh Development Project) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेश दौऱ्यात ₹१७,९०० कोटींहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन केले. यामध्ये पायाभूत सुविधा, सेमीकंडक्टर उत्पादन, हरित ऊर्जा आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा समावेश असून, राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.(Andhra Pradesh Development Project)
मोदी यांच्या हस्ते विजयनगरम जिल्ह्यातील भोगापूरम येथील अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. सुमारे ₹५,००० कोटी खर्चाच्या या विमानतळामुळे उत्तर आंध्र प्रदेशातील उद्योग, पर्यटन आणि गुंतवणुकीला नवी गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.(Andhra Pradesh Development Project)
विशाखापट्टणम येथे ₹४६० कोटींच्या एएसआयपी सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. इंडिया सेमीकंडक्टर मिशनअंतर्गत राज्यातील हा पहिला प्रकल्प असून, दरवर्षी सुमारे ९.६ कोटी सेमीकंडक्टर चिप्सचे उत्पादन होणार आहे.(Andhra Pradesh Development Project)
ऊर्जा क्षेत्रात ₹५,५५० कोटींच्या कुर्नूल-IV पारेषण प्रणालीची पायाभरणी, तसेच ₹३,५५० कोटींच्या पवन-सौर ऊर्जा पारेषण प्रणाली आणि ₹८२० कोटींच्या सौर ऊर्जा पारेषण योजनेचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे हरित ऊर्जा राष्ट्रीय ग्रीडमध्ये अधिक प्रभावीपणे समाकलित होणार आहे.(Andhra Pradesh Development Project)
याशिवाय ₹१,८८० कोटींच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजनही करण्यात आले. या प्रकल्पांमुळे विजयवाडा परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन विशाखापट्टणम–हैदराबाद प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.(Andhra Pradesh Development Project)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.