संसद भवन परिसरात विरोधकांची विकृत स्टंटबाजी; खासदारांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; संपूर्ण घटनेचा सविस्तर आढावा

    01-Aug-2026
Ram Mandir Movement in Parliament
 
मुंबई : (Ram Mandir Movement in Parliament) संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना महत्त्वाच्या धोरणात्मक चर्चांना बाजूला सारत, संसद भवनाच्या मकर द्वाराबाहेर विरोधी पक्षांनी श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणावरून केलेले 'प्रतीकात्मक आंदोलन' तीव्र वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. राजकीय निषेध व्यक्त करण्याच्या नावाखाली अयोध्येतील श्रीराम मंदिर, तेथील पुजारी आणि संपूर्ण संत परंपरेचे विडंबन करण्यात आल्याची भावना हिंदू धर्मीयांमध्ये उमटली असून या घटनेवर सर्वस्तरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
 
विरोधकांचे विकृतआंदोलनाचे स्वरूप
 
आंदोलनादरम्यान पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी थेट साधू-पुजाऱ्याचा वेष परिधान करून संसद भवन परिसरात बसल्याचे दिसले. त्यांच्यासमोर एक दानपेटी ठेवण्यात आली होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांतील काही नेत्यांनी या दानपेटीत पैसे टाकले, तर वेशांतर केलेल्या पप्पू यादव यांनी ते पैसे खिशात घालण्याची कृती केली. या आंदोलनात समाजवादी पक्षाच्या खासदारांनीही सहभाग घेतला.(Ram Mandir Movement in Parliament) 
 
आंदोलनाच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धेचा पोरखेळ
 
राजकीय विरोध किंवा कोणत्याही मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा अधिकार लोकशाहीत नक्कीच आहे. परंतु, आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी थेट भगवान श्रीराम, अयोध्या राम मंदिर आणि सनातन धर्मात आदरणीय मानल्या जाणाऱ्या साधू-संतांच्या प्रतीकात्मक प्रतिमेचा असा उपहास करणे अत्यंत दुर्दैवी आहे. कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेचे केंद्र असलेल्या राम मंदिराच्या आणि त्यातील पुजाऱ्यांच्या वेशाचा वापर करून 'पैसे खिशात घालणे' अशा प्रकारची दृष्ये दाखवणे, म्हणजे एका संपूर्ण धार्मिक परंपरेला आणि श्रद्धेला गालबोट लावण्याचा प्रयत्न असल्याचे हिंदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे. (Ram Mandir Movement in Parliament) 
 
तिन्ही नेत्यांविरोधात गुन्हा दाखल
 
वाराणसीमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार पप्पू यादव आणि अयोध्याचे खासदार अवधेश प्रसाद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा संसद भवनातील या विकृत आंदोलनाशी संबंधित आहे.भाजप व्यतिरिक्त इतर काही संघटनांनीही यावर टीका केली आहे. इतकेच नाही, तर आता या तिन्ही नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
संतांच्या तक्रारीच्या आधारे वाराणसीतील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाराणसीमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार पप्पू यादव आणि अयोध्याचे खासदार अवधेश प्रसाद तीन खासदारांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.(Ram Mandir Movement in Parliament)
 
 




संबंधित मजकूर