मुंबईत 'विकेंद्रित कचरा प्रक्रिया अभियान'; सोसायट्यांनी जागेवरच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यास १५ टक्क्यांपर्यंत मालमत्ता करात सवलत

    01-Aug-2026
Mumbai Municipal Corporation
 
मुंबई : (Mumbai Municipal Corporation) घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ अन्वये महापालिकेने 'विकेंद्रित कचरा प्रक्रिया अभियान' सुरू केले असून, मोठ्या गृहनिर्माण संस्था, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक संकुले आणि अन्य मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांनी (बल्क वेस्ट जनरेटर्स) आपल्या आवारातच ओल्या कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश कचऱ्याची वाहतूक कमी करणे, पुनर्वापराला चालना देणे आणि 'सर्क्युलर इकॉनॉमी'ला बळकटी देणे हा आहे.
 
महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबईत सध्या ३ हजार १७७ बल्क वेस्ट जनरेटर्सची नोंद असून त्यापैकी २ हजार २५ संस्थांनी 'मायवेस्ट' पोर्टलवर नोंदणी केली आहे. तसेच ५१३ संस्थांकडे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक स्वतंत्र जागा उपलब्ध आहे. (Mumbai Municipal Corporation)
 
या अभियानांतर्गत बल्क वेस्ट जनरेटर्सनी ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया करून खतनिर्मिती करणे, तसेच सुका कचरा अधिकृत पुनर्प्रक्रिया संस्थांकडे सुपूर्द करणे अपेक्षित आहे. या उपक्रमामुळे कचरा वाहतुकीत घट होईल, लँडफिलवरील ताण कमी होईल, हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी होईल आणि पुनर्वापराला चालना मिळेल. परिणामी, मुंबईत शाश्वत कचरा व्यवस्थापन आणि 'सर्क्युलर इकॉनॉमी' संकल्पनेला गती मिळणार आहे. (Mumbai Municipal Corporation)
 
महापालिकेच्या निकषांचे पालन करून जागेवरच ओल्या कचऱ्याची प्रक्रिया करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करात १५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. तसेच गृहनिर्माण संस्था आणि अन्य बल्क वेस्ट जनरेटर्सना तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने 'एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट' (ईओआय) मागविले आहे. निवडलेल्या संस्थांकडून जागेचे तांत्रिक सर्वेक्षण, योग्य तंत्रज्ञानाची निवड, प्रकल्प उभारणी, संचालन व देखभाल, प्रशिक्षण, जनजागृती आणि कायदेशीर अनुपालनासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. (Mumbai Municipal Corporation)
 
महापालिका आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाला पात्र बल्क वेस्ट जनरेटर्सची ओळख करून त्यांना जागेवरच कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी सक्रिय सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे महापालिकेवरील कचरा संकलन, वाहतूक आणि विल्हेवाटीचा ताण कमी होऊन मुंबई अधिक स्वच्छ, हरित आणि शाश्वत शहर बनण्यास मदत होईल. दिघावकर यांनी नागरिक, गृहनिर्माण संस्था आणि अन्य बल्क वेस्ट जनरेटर्स यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. (Mumbai Municipal Corporation)
 
"विकेंद्रित कचरा प्रक्रिया ही मुंबईच्या शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गृहनिर्माण संस्था आणि अन्य बल्क वेस्ट जनरेटर्स यांनी ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया केल्यास कचरा वाहतूक कमी होईल, पुनर्वापराला चालना मिळेल आणि स्वच्छ, हरित मुंबई घडविण्यास मोठी मदत होईल." (Mumbai Municipal Corporation)
 
– किरण दिघावकर, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन), मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation)
 
 




संबंधित मजकूर