मुंबई (Kulgam terrorist attack, Hindu labourer, Pahalgam attack) :काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा २०२५ मधील पहलगाम हल्ल्याची पुनरावृत्ती घडली. पहलगाममध्ये ज्या प्रकारे निष्पाप नागरिकांना त्यांची ओळख, त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या होत्या, त्याच अमानुष पद्धतीने दहशतवाद्यांनी कुलगाममध्ये दोन मजुरांवर गोळीबार केला. यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे.(Kulgam terrorist attack, Hindu labourer, Pahalgam attack)
मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाममध्ये काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या समूहाकडे दहशतवाद्यांनी प्रथम त्यांची नावे विचारून ओळख निश्चित केली. त्यानंतर समूहातील दोन हिंदू मजुरांना वेगळे करून अगदी जवळून गोळ्या झाडल्या. या भ्याड हल्ल्यात छत्तीसगडमधील एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.(Kulgam terrorist attack, Hindu labourer, Pahalgam attack)
घटनास्थळी अनेक परराज्यातील मजूर उपस्थित असतानाही केवळ हिंदू मजुरांनाच लक्ष्य करण्यात आल्याने धार्मिक ओळखीच्या आधारावर ही लक्ष्यित हिंसा घडवून आणल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. तपास यंत्रणांच्या प्राथमिक अंदाजानुसार या हल्ल्यात एक स्थानिक आणि एक विदेशी दहशतवादी सहभागी होता. मोहम्मद लतीफ नावाचा दहशतवादी या तपासाच्या केंद्रस्थानी असून, तो गेल्या वर्षी लष्कर-ए-तैयबा किंवा त्याच्या द रेसिस्टन्स फ्रंट या संघटनेत सहभागी झाल्याचे सांगितले जात आहे. सुरक्षा यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.(Kulgam terrorist attack, Hindu labourer, Pahalgam attack)
जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पोलीस महासंचालक नलिन प्रभात आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संपूर्ण परिसराला सुरक्षा घेरा घालण्यात आला असून शोधमोहीम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीने या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पक्षाचे प्रमुख प्रवक्ते रविंदर शर्मा यांनी ही घटना अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगत, दहशतवाद्यांचे नापाक डाव कोणत्याही परिस्थितीत हाणून पाडले पाहिजेत, असे म्हटले.(Kulgam terrorist attack, Hindu labourer, Pahalgam attack)
यावर्षी काश्मीरमधील परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून आले होते. अमरनाथ यात्रेला विक्रमी संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती, तर पर्यटन क्षेत्रही पुन्हा वेगाने उभारी घेत होते. मात्र, कुलगाम हल्ल्यानंतर दक्षिण काश्मीरमध्ये, विशेषतः अमरनाथ यात्रा मार्गांवर आणि स्थलांतरित मजूर राहत असलेल्या भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध अद्याप सुरू आहे.(Kulgam terrorist attack, Hindu labourer, Pahalgam attack)
पीओकेतील तीव्र आंदोलनापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न
पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेल्या तीव्र जनआंदोलनांपासून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष विचलित करण्यासाठी
पाकिस्तान अशा प्रकारच्या कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचा दावा काही सुरक्षा तज्ज्ञांनी केला आहे. त्यांच्या मते, जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करून पीओकेतील परिस्थितीवरून जगाचे लक्ष हटविण्याचा हा प्रयत्न आहे. सुरक्षा आणि गुप्तचर क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे की, पीओकेमधील वाढत्या असंतोषामुळे पाकिस्तान आणि त्याची गुप्तचर संस्था आयएसआय चिंतेत आहे. माजी पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितले की, काश्मीरमध्ये अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले घडवून आणून पाकिस्तान पीओकेतील आंदोलनांवरून लक्ष भारताकडे वळवू इच्छितो. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या मते, जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण होत असलेली शांतता आणि सामान्य स्थिती पाकिस्तानला सहन होत नसल्याने तो आपल्या दहशतवादी हस्तकांना निष्पाप आणि निःशस्त्र नागरिकांवर हल्ले करण्यासाठी प्रवृत्त करीत आहे.(Kulgam terrorist attack, Hindu labourer, Pahalgam attack)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक