ऑगस्टपासून फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना मिळणार ‘नेटफ्लिक्स’चे मोफत सबस्क्रिप्शन!

    01-Aug-2026

Flipkart Plus Netflix Offer, Free Netflix Subscription, Flipkart Plus
 
 
मुंबई(Flipkart Plus Netflix Offer, Free Netflix Subscription, Flipkart Plus) : तुम्ही जर ऑनलाइन शॉपिंग फ्लिपकार्टद्वारे करता तर तुमच्यासाठी कंपनीने एक बोनस ऑफर लागू केली आहे. आता फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना त्यांच्या नियमित खरेदीच्या बदल्यात नेटफ्लिक्स मोबाईल प्लॅन मिळणार आहे. विशेष म्हणजे यासाठी स्वतंत्र नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन घेण्याची किंवा कोणताही अतिरिक्त रिचार्ज करण्याची गरज नाही. केवळ ठरावीक अटी पूर्ण केल्यानंतर हा लाभ मिळणार असून, १ ऑगस्ट २०२६ पासून ही सुविधा सुरू होत आहे.(Flipkart Plus Netflix Offer, Free Netflix Subscription, Flipkart Plus)
 
दररोजच्या खरेदीला अधिक मूल्य देण्याच्या उद्देशाने फ्लिपकार्ट आणि नेटफ्लिक्स यांनी ही भागीदारी जाहीर केली आहे. भारतातील ई-कॉमर्स क्षेत्रात नियमित शॉपिंगमधून नेटफ्लिक्ससारख्या जागतिक दर्जाच्या मनोरंजनाचा लाभ मिळण्याची ही पहिलीच संधी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.(Flipkart Plus Netflix Offer, Free Netflix Subscription, Flipkart Plus)
 
नेटफ्लिक्स मोफत मिळवण्यासाठी काय करावे?
 
फ्लिपकार्ट प्लस सदस्यांनी एका कॅलेंडर महिन्यात ₹२९९ किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या चार पात्र ऑर्डर्स पूर्ण कराव्या लागतील. या ऑर्डर्स Flipkart, Flipkart Grocery आणि Flipkart Minutes या तिन्ही सेवांवरून करता येतील. चौथी पात्र ऑर्डर पूर्ण होताच ग्राहकांसाठी ३० दिवसांचा नेटफ्लिक्स मोबाईल प्लॅन अनलॉक होईल. हा प्लॅन थेट फ्लिपकार्ट अॅपमधून सक्रिय करता येईल. यासाठी वेगळे लॉगिन, कूपन किंवा अतिरिक्त पेमेंटची आवश्यकता नाही.(Flipkart Plus Netflix Offer, Free Netflix Subscription, Flipkart Plus)
 
कोणाला मिळणार हा फायदा?
 
सध्या फ्लिपकार्ट प्लस सदस्य असलेल्यांना हा लाभ त्वरित मिळू शकतो. तर जे ग्राहक अद्याप प्लस सदस्य नाहीत, ते १२ महिन्यांत १५ ऑर्डर्स पूर्ण केल्यानंतर कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता आपोआप फ्लिपकार्ट प्लस सदस्य बनतील.(Flipkart Plus Netflix Offer, Free Netflix Subscription, Flipkart Plus)
 
हा लाभ पुन्हा कसा मिळेल?
 
एकदा नेटफ्लिक्सचा ३० दिवसांचा लाभ संपल्यानंतर तो आपोआप रीसेट होईल. त्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने चार पात्र ऑर्डर्स पूर्ण करून पुढील महिन्याचा नेटफ्लिक्स मोबाईल प्लॅन मिळवता येईल.(Flipkart Plus Netflix Offer, Free Netflix Subscription, Flipkart Plus)
 
'जेन झी'साठी विशेष ऑफर
 
कंपनीच्या मते, आजच्या डिजिटल पिढीसाठी खरेदी आणि मनोरंजन हे एकमेकांशी जोडलेले अनुभव आहेत. त्यामुळे केवळ कॅशबॅक किंवा पॉइंट्स देण्याऐवजी प्रत्यक्ष वापरता येणारे मनोरंजन देण्याचा हा प्रयत्न आहे. विशेषतः टियर-२ आणि टियर-३ शहरांतील ग्राहकांनाही या योजनेचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. फ्लिपकार्टचे मुख्य वित्तीय अधिकारी आणि धोरणात्मक भागीदारीचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवी अय्यर म्हणाले की, ग्राहक आधीपासूनच दर महिन्याला अनेक ऑर्डर्स देतात. त्या सवयीला आता जागतिक दर्जाच्या मनोरंजनाचा लाभ जोडण्यात आला आहे. ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन खरेदीतून अधिक मूल्य मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.(Flipkart Plus Netflix Offer, Free Netflix Subscription, Flipkart Plus)
नेटफ्लिक्सचे उपाध्यक्ष (एपीएसी भागीदारी – व्यवसाय विकास) लॉरेंट युगेन यांनी सांगितले की, भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मनोरंजन बाजारपेठांपैकी एक आहे. फ्लिपकार्टसोबतच्या भागीदारीमुळे लाखो भारतीयांना त्यांच्या नियमित खरेदीच्या माध्यमातून नेटफ्लिक्सचा लाभ सहज मिळू शकेल(Flipkart Plus Netflix Offer, Free Netflix Subscription, Flipkart Plus) 
 
 




संबंधित मजकूर