'विकसित भारत' हेच आजच्या युवकांचे जन्मसिद्ध कर्तव्य; राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान द्या : अजित डोवाल

लोकमान्य टिळकांच्या विचारांतून तरुणांना राष्ट्रनिर्मितीचे आवाहन;स्वार्थापेक्षा देश प्रथम ठेवण्याचा संदेश

    01-Aug-2026
Ajit Doval Lokmanya Tilak National Award
 
मुंबई : (Ajit Doval Lokmanya Tilak National Award) "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा संदेश आजच्या काळात नव्या रूपाने स्वीकारण्याची गरज आहे. आजच्या युवकांसाठी तो संदेश म्हणजे 'भारताला विकसित, सक्षम आणि शक्तिशाली राष्ट्र बनवणे हेच आपले जन्मसिद्ध कर्तव्य आहे', असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी केले. लोकमान्य टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना त्यांनी विशेषतः देशातील युवकांना राष्ट्रहितासाठी स्वतःला समर्पित करण्याचे आवाहन केले.(Ajit Doval)
 
टिळक स्वराज स्मारक ट्रस्टतर्फे शनिवार, दि.१ ऑगस्ट रोजी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देण्यासाठी केलेली त्यांची असामान्य सेवा, धैर्य, दूरदृष्टी आणि दीर्घकालीन योगदान याबद्दल त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला.(Ajit Doval Lokmanya Tilak National Award)
 
 
लोकमान्य टिळकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, टिळक स्वराज स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारताना डोवाल यांनी हा सन्मान नम्रतेने स्वीकारत तो लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रवादी विचारांना वाहिलेली आदरांजली असल्याचे सांगितले.(Ajit Doval Lokmanya Tilak National Award)
 
सन्मान स्वीकारताना डोवाल म्हणाले की, लोकमान्य टिळकांची प्रासंगिकता आजही कमी झालेली नाही. उलट आजच्या भारताला त्यांच्या विचारांची अधिक आवश्यकता आहे. भारताची कल्पना, राष्ट्रनिर्मितीचा त्यांचा दृष्टिकोन आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेला संघर्ष प्रत्येक युवकाने समजून घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.(Ajit Doval Lokmanya Tilak National Award)
 
आजच्या तरुणांना स्वातंत्र्य सहज मिळाल्यासारखे वाटते; मात्र स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार नसून त्यासाठी लाखो देशभक्तांनी प्राणांची आहुती दिली आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असे डोवाल यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झालेला संघर्ष, त्याग आणि बलिदान समजून घेतल्याशिवाय राष्ट्राबद्दलची जबाबदारी समजणार नाही, असे ते म्हणाले.(Ajit Doval Lokmanya Tilak National Award)
 
लोकमान्य टिळकांनी केवळ "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" एवढेच सांगितले नाही, तर "तो मी मिळवणारच" हा दृढ निश्चय देशाला दिला. आजच्या काळात त्याच घोषणेचे रूपांतर "विकसित भारत घडवणे हे माझे जन्मसिद्ध कर्तव्य आहे आणि ते मी पूर्ण करूनच राहीन" अशा संकल्पात झाले पाहिजे, असे डोवाल यांनी सांगितले. देशातील प्रत्येक युवकाने हा संकल्प स्वीकारला, तर भारताला महासत्ता बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Ajit Doval)
 
जीवनात प्रत्येक व्यक्तीसमोर अनेक इच्छा, अपेक्षा आणि संधी येतात. मात्र त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे काय, याचा विचार करणे आवश्यक आहे. जर राष्ट्रसेवा हेच सर्वोच्च ध्येय असेल, तर वैयक्तिक लाभ, समाज, जात किंवा इतर स्वार्थ दुय्यम ठरले पाहिजेत. राष्ट्रहिताच्या विरोधात जाणारा कोणताही वैयक्तिक फायदा स्वीकारू नये, असा स्पष्ट संदेश त्यांनी युवकांना दिला.
 
राष्ट्रनिर्मितीची सुरुवात राष्ट्रभावनेतून होते. लोकमान्य टिळकांचा सर्वात मोठा वारसा म्हणजे जनतेमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणे. प्रत्येक भारतीयाने स्वतःच्या इच्छांपेक्षा देशाचे हित सर्वोच्च मानले, तरच भारत खऱ्या अर्थाने विकसित आणि सुरक्षित राष्ट्र बनेल, असे डोभाल यांनी सांगितले.(Ajit Doval Lokmanya Tilak National Award)
 
भारत आज विकासाच्या निर्णायक टप्प्यावर आहे. जगातील अनेक शक्तींना भारताची झपाट्याने होणारी प्रगती मान्य नसली, तरी देशाकडे सक्षम नेतृत्व आणि योग्य दिशा आहे. त्यामुळे आजचा काळ हा भारतासाठी 'विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी' असून युवकांनी हा काळ वाया जाऊ देऊ नये. देश घडविण्यासाठी स्वतःला झोकून देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.(Ajit Doval Lokmanya Tilak National Award)
 
भाषणाच्या समारोपात डोभाल यांनी राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या 'आग की भीख' या कवितेचा उल्लेख केला. "प्रिय स्वदेश के हित अंगार मांगता हूँ" या ओळी उद्धृत करत त्यांनी युवकांनी राष्ट्रहितासाठी ज्वलंत समर्पणाची भावना बाळगावी, वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवावा आणि भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.(Ajit Doval Lokmanya Tilak National Award)
 
"लोकमान्य टिळकांनी दिलेला 'स्वराज्य'चा मंत्र आज 'विकसित भारत' घडविण्याची प्रेरणा देतो" : अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
"लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केवळ स्वातंत्र्याची हाक दिली नाही, तर राष्ट्राच्या सांस्कृतिक चेतनेला जागृत केले. शासनव्यवस्था, भाषा, संस्कृती, धर्म आणि राष्ट्रीय स्वाभिमान यांच्या बळावरच खरे स्वराज्य उभे राहू शकते, हा त्यांचा विचार आजही तितकाच मार्गदर्शक आहे. लोकमान्य टिळकांनी 'केसरी' आणि 'द मराठा' या वृत्तपत्रांतून निर्भीड पत्रकारिता केली, शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीचा पाया रचला आणि सार्वजनिक उत्सवांतून समाजाला संघटित करून राष्ट्रभावना जागवली. आजचा भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्याच सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मार्गावर आत्मविश्वासाने पुढे जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा भारताच्या सुरक्षेला अभेद्य बनविण्यात अजित डोभाल यांनी बजावलेल्या भूमिकेचे सुवर्णाक्षरांनी स्मरण केले जाईल."(Ajit Doval Lokmanya Tilak National Award)
 
अजित डोवाल यांचे कार्य प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी : देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
 
 
 
"राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६' प्रदान होत असल्याचा महाराष्ट्राला अभिमान आहे. 'राष्ट्रीय सुरक्षेत रौप्यपदक नसते; जिंकलात तर इतिहास घडवता, हरलात तर इतिहास होता,' हा त्यांचा विचार त्यांच्या संपूर्ण कार्याचा आरसा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेला नवे सामर्थ्य, स्पष्ट धोरण आणि निर्णायक दिशा दिली. अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेला बळकटी देतानाच भारताचा जागतिक स्तरावरील आत्मविश्वास वाढविण्यात त्यांचे योगदान ऐतिहासिक आहे. अजित डोभाल यांच्या कार्यातून हीच मूल्ये आधुनिक भारतात अधिक सक्षमपणे प्रतिबिंबित होताना दिसतात. हा पुरस्कार त्यांच्या अद्वितीय योगदानाचा गौरव असून देशसेवेसाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी तो प्रेरणादायी ठरेल."(Ajit Doval Lokmanya Tilak National Award)
 
 




संबंधित मजकूर