एनएससीआय शुल्कप्रकरणी १५ दिवसांत बैठक;चौकशी समिती स्थापन होणार

मंत्री शंभूराज देसाई यांची सभागृहात माहिती

NSCI Fee Dues Inquiry
 
मुंबई : (NSCI Fee Dues Inquiry) वरळी येथील 'द नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया' (एनएससीआय) संस्थेकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेला देय असलेल्या शुल्कप्रकरणी अधिवेशन संपल्यानंतर १५ दिवसांच्या आत बैठक घेण्यात येणार असून, संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.
 
विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सदस्य अनिल परब यांनीही चर्चेत सहभाग घेतला. त्यास उत्तर देताना मंत्री देसाई यांनी सांगितले की, या प्रकरणात लोकलेखा समितीने केलेल्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी करण्यात येईल. चौकशी समितीच्या अहवालानुसार पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल.
 
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, महानगरपालिकेने यापूर्वी संबंधित संस्थेकडून देय शुल्कापोटी ६६ कोटी रुपये तसेच अनधिकृत बांधकाम प्रकरणी ११ कोटी रुपये वसूल केले आहेत. उर्वरित थकीत रक्कम टप्प्याटप्प्याने वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.(NSCI Fee Dues Inquiry)
 
संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचे ऑडिट आणि सखोल चौकशी करून तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकलेखा समितीच्या शिफारशी आणि चौकशी अहवालाच्या आधारे संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही सरकारने स्पष्ट केले.(NSCI Fee Dues Inquiry)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर