मुंबई : (Mumbai Pune Missing Link Reopens) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्प परिसरात दरड कोसळल्याने विस्कळीत झालेली वाहतूक अवघ्या २४ तासांत पूर्ववत केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानपरिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
मुसळधार पावसामुळे बोगद्याजवळ दरड आणि सिमेंटचा स्लॅब कोसळल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणारी मार्गिका सोमवार, दि. ६ जुलै रोजी पहाटेपासून पूर्णपणे बंद करण्यात आली होती. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), पोलीस आणि प्रशासनाने युद्धपातळीवर बचाव आणि दुरुस्तीची कामे हाती घेतली.(Mumbai Pune Missing Link Reopens)
दरड हटविणे, रस्ता स्वच्छ करणे आणि सुरक्षिततेची खात्री करून अवघ्या २४ तासांच्या आत वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. या जलद कार्यवाहीबद्दल मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एमएसआरडीसी आणि घटनास्थळी रात्रंदिवस काम करणाऱ्या सर्व यंत्रणांचे कौतुक केले.(Mumbai Pune Missing Link Reopens)
संकटकाळात प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेमुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळाल्याचे नमूद करत, अशा आपत्कालीन परिस्थितीत जलद निर्णयक्षमता आणि समन्वयाचे महत्त्व या घटनेतून अधोरेखित झाल्याचेही नार्वेकर यांनी म्हटले.(Mumbai Pune Missing Link Reopens)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.