एसआयआरच्या कामासाठी गेलेल्या बीएलओ व सरकारी अधिकाऱ्याला मारहाण; दोन धर्मांध मुस्लिम हल्लेखोरांना अटक

    31-Jul-2026   
Bengaluru Crime
 
मुंबई : (Bengaluru Crime) कर्नाटकात बंगळुरु येथे एसआयआर संदर्भात काम करत असलेल्या एका सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दस्तगीर आणि यारब या दोन धर्मांध मुस्लिम तरुणांना अटक केली आहे. स्लम डेव्हलपमेंट बोर्डाचे अधीक्षक पकीरप्पा हे बूथ लेव्हल अधिकारी यांच्यासोबत एसआयआरचे काम करण्यासाठी तेथे गेले होते. तेव्हा तिथे उपस्थित दस्तगीर नावाच्या व्यक्तीने बीएलओकडे एसआयआरचा फॉर्म मागितला. त्यावर बीएलओने तो फॉर्म संबंधित व्यक्तीला त्याच्या संबंधित मतदारसंघातूनच मिळेल, त्यामुळे ते तो देऊ शकत नाहीत, असे सांगितले. याच कारणावरून पुढे वाद सुरू झाला.(Bengaluru Crime)
 
वाद वाढत असल्याचे पाहून पकीरप्पा यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दस्तगीर आणि त्याच्या सोबत असलेल्या यारब या दोघांनाही बीएलओसोबत वाद घालण्यावरून प्रश्न उपस्थित केला. तेव्हा एका आरोपीने पकीरप्पा यांच्यावर हल्ला केला. पकीरप्पा यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, दुसऱ्या आरोपीने त्यांच्या डोळ्याजवळ आणि पाठीवरही मारहाण केली, ज्यामुळे त्यांना अनेक दुखापती झाल्या. वाद अधिकच वाढल्यानंतर स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंना शांत केले. त्यानंतर पकीरप्पा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली आणि उपचारासाठी डॉ. बी. आर. आंबेडकर मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल झाले.(Bengaluru Crime)
 
पकीरप्पा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दस्तगीर आणि यारब यांच्याविरुद्ध सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानंतर दोघांनाही अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. असा दावाही करण्यात आला आहे की, कर्नाटकमध्ये बांगलादेशातून बेकायदेशीररीत्या भारतात आलेल्या घुसखोरांची संख्या वाढत असून, त्यांच्यासाठी हे राज्य प्रमुख आश्रयस्थान बनले आहे.(Bengaluru Crime)
 
याच संदर्भात काही दिवसांपूर्वी एका डॉक्टरांनी राज्यात वाढत्या बांगलादेशी स्थलांतरितांबाबत माहिती दिली होती. मात्र, राज्यातील काँग्रेस सरकारच्या पोलिसांनी संबंधित डॉक्टरांवरच गुन्हा दाखल दाखल केला, असा दावा करण्यात आला आहे. हे प्रकरण पुढे कर्नाटक उच्च न्यायालयात गेले असून, तेथे न्यायालयाने पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.(Bengaluru Crime)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर