‘मेड इन इंडिया – द टायटन स्टोरी’तून स्वदेशी विचार, उद्योजकता आणि आत्मविश्वासाचा प्रेरणादायी प्रवास

संस्कार भारतीच्या ‘सिनेटॉकिज’ उपक्रमात विशेष स्क्रीनिंगनंतर मान्यवरांची उद्योग, नवोन्मेष आणि बदलत्या भारतावर सखोल चर्चा

    31-Jul-2026   
Made in India The Titan Story
 
मुंबई : (Made in India The Titan Story) संस्कार भारती, कोकण प्रांताच्या वतीने आयोजित सिनेटॉकिज या मालिकेचा संपादित भाग प्रदर्शन आणि त्यावर प्रश्नोत्तरे आणि चर्चा अशा विशेष उपक्रमांतर्गत 'मेड इन इंडिया - द टायटन स्टोरी' या प्रेरणादायी मालिकेचे विशेष स्क्रीनिंग आणि त्यानंतर चर्चा आणि प्रश्नोत्तराचे आयोजन करण्यात आले. मालाड पश्चिम येथील डी. जी. खेतन आंतरराष्ट्रीय विद्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमात भारतीय उद्योगविश्व, स्वदेशी विचार, उद्योजकता, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि बदलत्या भारताच्या वाटचालीवर सखोल चर्चा झाली.
 
सिनेटॉकिज हा केवळ चित्रपट प्रदर्शनाचा उपक्रम नसून ‘सिनेसृष्टी, भारतीय दृष्टि’ या मूलभावनेतून सिनेमा, भारतीय संस्कृती, जीवनमूल्ये आणि सामाजिक जाणीव यांच्या संदर्भात अर्थपूर्ण संवाद घडवून आणणारे व्यासपीठ आहे. याच भूमिकेतून ‘मेड इन इंडिया - द टायटन स्टोरी’ या विषयाची निवड करण्यात आली. भारतीय विचार, मेहनत आणि नवोन्मेषाच्या बळावर जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणाऱ्या एका उद्योगप्रवासाची यशस्वी कथा प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली.(Made in India The Titan Story)
 
कार्यक्रमादरम्यान चंद्रशेखर वझे, प्रशांत देशपांडे, ऋषिकेश जोशी, ध्रुव कांडपाल आणि अरुण शेखर हे मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ‘मेड इन इंडिया - द टायटन स्टोरी’ या मालिकेचे संक्षिप्त विशेष स्क्रीनिंग करण्यात आले. स्क्रीनिंगनंतर वझे आणि देशपांडे यांच्याबरोबर मालिकेविषयी चर्चा आणि प्रश्नोत्तरे झाली. त्याचे संचालन ज्येष्ठ मल्टिमीडिया पत्रकार आणि वृत्तनिवेदिका रूना आशिष यांनी केले. या संवादात त्यांनी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधत मालिकेतील आशय, भारतीय उद्योगविश्वातील बदल आणि स्वदेशी विचाराच्या संदर्भातील विविध पैलू उलगडले.(Made in India The Titan Story)
 
यावेळी प्रशांत नीळकंठ देशपांडे यांनी ‘मेड इन इंडिया - द टायटन स्टोरी’ पाहिल्यानंतरचा अनुभव सांगताना भारतीय उद्योग आणि स्वदेशी विचाराच्या वाढत्या प्रभावावर भाष्य केले. “देश आता बदलतो आहे आणि देश प्रगतीपथावर आहे,” असे सांगत त्यांनी भारतातील नव्या पिढीच्या आत्मविश्वासाकडे लक्ष वेधले. देशातील तरुण, प्रबुद्ध नागरिक आणि उद्योजक स्वदेशी भावनेने पुढे जात असून, स्वतःचे संगीत, भाषा, भोजन आणि उत्पादन यांचा अभिमान बाळगण्याची भावना वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा भारतीय यशोगाथा आणि प्रेरणादायी कथा नव्या पिढीच्या विकासासाठी प्रेरणा देतात, असेही त्यांनी सांगितले.
 
चर्चेदरम्यान चंद्रशेखर वझे यांनी भारतात पूर्वी परदेशी कंपन्यांच्या उत्पादनांकडे असलेले आकर्षण आणि भारतीय उत्पादनांबाबतची ग्राहकांची मानसिकता यावर भाष्य केले. अनेकदा परदेशी उत्पादनांना गुणवत्ता आणि दर्जाचे प्रतीक मानले जात असे; मात्र आता भारतीय उत्पादनांनीही आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता निर्माण करण्यास सुरुवात केली असून ग्राहकांना देशातच दर्जेदार पर्याय उपलब्ध होत आहेत, असे त्यांनी सांगितले.(Made in India The Titan Story)
 
भारतीय उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास निर्माण करण्यात देशातील मोठ्या उद्योगसमूहांचे योगदान महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भारतीय ग्राहकांमध्ये स्वदेशी उत्पादनांविषयीचा विश्वास वाढत असून, भविष्यात या बदलाचा भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि उद्योगविश्वाला मोठा फायदा होऊ शकतो, असा सूर त्यांच्या मांडणीतून उमटला.(Made in India The Titan Story)
 
चर्चेत स्वदेशी म्हणजे केवळ स्वदेशी उत्पादन खरेदी करणे नव्हे, तर एक व्यापक विचार आहे, या मुद्द्यावरही विशेष भर देण्यात आला. स्वदेशी भावनेतून आपल्या भाषा, संस्कृती, जीवनपद्धती, अन्न आणि स्थानिक उत्पादनांकडे पाहण्याची दृष्टी विकसित होणे आवश्यक असल्याचे चर्चेत मांडण्यात आले. स्वदेशीचा विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्याशिवाय हा प्रवास पूर्ण होणार नाही, असेही मत व्यक्त करण्यात आले.(Made in India The Titan Story)
 
या चर्चेत उद्योजकतेच्या वाढत्या संधींवरही प्रकाश टाकण्यात आला. ‘मेड इन इंडिया - द टायटन स्टोरी’ मधून केवळ एका उद्योगसमूहाचा प्रवास समोर येत नाही, तर कल्पना, सातत्य, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या बळावर मोठी स्वप्ने साकारता येतात, हा संदेशही मिळतो, असे मान्यवरांनी नमूद केले. विशेषतः नव्या पिढीतील स्टार्टअप्स आणि उद्योजकांसाठी अशा कथा प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण ठरू शकतात, असा सूर चर्चेत व्यक्त झाला. टायटनच्या प्रवासाच्या संदर्भातून भारतीय उद्योगविश्वात ‘आपणही करू शकतो’ हा आत्मविश्वास निर्माण होणे ही या संपूर्ण वाटचालीची महत्त्वाची बाजू असल्याचे चर्चेत अधोरेखित झाले.(Made in India The Titan Story)
 
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ध्येयावरील विश्वास, सातत्य आणि चिकाटी या गुणांचे महत्त्वही यावेळी स्पष्ट करण्यात आले. व्यवसायापुरते मर्यादित न राहता शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, सामाजिक कार्य किंवा कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी हेच गुण आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.(Made in India The Titan Story)
 
कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी संस्कार भारती, कोकण प्रांताचे उपाध्यक्ष अरुण शेखर यांनी आभार प्रदर्शन करतान कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे, वक्त्यांचे, आयोजकांचे, सहकाऱ्यांचे, डीजी खेतान शाळेचे व्यवस्थापन आणि कर्मचारी वृंद आणि प्रेक्षकांचे आभार मानले. उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.(Made in India The Titan Story)
 
‘मेड इन इंडिया - द टायटन स्टोरी’ या विशेष स्क्रीनिंगच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा सिनेटॉकीजचा कार्यक्रम भारतीय उद्योगक्षेत्राच्या प्रवासाकडे केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून न पाहता स्वदेशी विचार, नवोन्मेष, उद्योजकता आणि आत्मविश्वासाच्या व्यापक संदर्भातून पाहण्याची संधी देणारा ठरला.(Made in India The Titan Story)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर