सह्याद्रीतील दोन वाघांच्या अधिवासात कृत्रिम वाळू प्रकल्प; ग्रामस्थांचा तीव्र विरोध

    30-Jul-2026
sindhudurg ker village



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मौजे केर येथे प्रस्तावित एम-सँड (कृत्रिम वाळू) प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे (sindhudurg ker village). या प्रकल्पास कोणत्याही परिस्थितीत परवानगी देऊ नये, अशी मागणी तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे (sindhudurg ker village). विशेष म्हणजे, प्रस्तावित प्रकल्प परिसर हा दोन वाघांच्या नियमित अधिवासाचा भाग असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे (sindhudurg ker village). त्यामुळे या भागातील वन्यजीव संवर्धन आणि जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण होणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. (sindhudurg ker village)
 
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, केर हे पश्चिम घाटातील अत्यंत संवेदनशील, निसर्गसंपन्न आणि जैवविविधतेने समृद्ध गाव आहे. गावाभोवती दाट जंगल, नैसर्गिक जलस्रोत, विविध औषधी वनस्पती आणि दुर्मीळ वन्यजीव आढळतात. याच परिसरात वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत अनुसूची-१ मधील वाघ, हत्ती, स्लेंडर लोरिस, किंग कोब्रा, घोरपड तसेच इतर संरक्षित प्राणी आणि पक्ष्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. केरचे ग्रामस्थ तुषार देसाई यांनी विशेषतः अधोरेखित केले आहे की, प्रकल्प प्रस्तावित असलेल्या परिसरात दोन वाघांचा अधिवास असून, हा भाग त्यांच्या भ्रमणमार्गाचा आणि निवासाचा महत्त्वाचा पट्टा आहे. येथे मोठ्या प्रमाणावर खाणकाम, दगड क्रशिंग, यंत्रसामग्रीचा वापर आणि जड वाहनांची वाहतूक सुरू झाल्यास वाघांच्या नैसर्गिक अधिवासात व्यत्यय येईल. परिणामी वाघांचे स्थलांतर, मानव-वाघ संघर्ष आणि वन्यजीवांवरील दबाव वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
 
एम-सँड (M-Sand – Manufactured Sand) म्हणजे नैसर्गिक नदीतील वाळूला पर्याय म्हणून मोठ्या दगडांचे यांत्रिक पद्धतीने क्रशिंग करून तयार केलेली कृत्रिम वाळू. बांधकाम क्षेत्रात ही वाळू मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. केर येथील प्रकल्पामध्ये दगडांचे क्रशिंग युनिट, एम-सँड निर्मिती, मोठ्या ट्रकची वाहतूक आणि साठवण यांचा समावेश असेल, तर ग्रामस्थांचा विरोध केवळ "कृत्रिम वाळू"ला नसून त्या प्रक्रियेमुळे होणाऱ्या पर्यावरणीय परिणामांना आहे. विशेषतः, ग्रामस्थांनी मांडल्याप्रमाणे प्रकल्प परिसर हा दोन वाघांच्या अधिवासाचा भाग असल्यास, सततचा आवाज, धूळ आणि वाहनांची वर्दळ यामुळे वाघांसह इतर वन्यजीवांवर परिणाम होऊ शकतो.
 
 




संबंधित मजकूर