मुंबई : (Mallikarjun Kharge) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात पंजाबमधील संगरूर न्यायालयाने २०२३ मधील एका प्रकरणात १५,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने त्यांना १९ सप्टेंबर रोजी वैयक्तिकरित्या उपस्थित राहून जामीन घेण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायालयाने स्पष्ट केले की, निश्चित तारखेला खरगे स्वतः न्यायालयात हजर राहिले नाहीत, तर त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले जाऊ शकते. तसेच या प्रकरणाची सुनावणी आता फौजदारी स्वरूपात पुढे चालवली जाणार आहे. हे संपूर्ण प्रकरण कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ दरम्यान खरगे यांनी केलेल्या एका वक्तव्याशी संबंधित आहे.(Mallikarjun Kharge)
संगरूर येथील रहिवासी आणि बजरंग दलाशी संबंधित हितेश भारद्वाज यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, निवडणूक प्रचारादरम्यान आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या संदर्भात खरगे यांनी बजरंग दलाची तुलना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेशी केली होती. याशिवाय, काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास बजरंग दलावर बंदी घालण्यात येईल, असेही त्यांनी म्हटल्याचा आरोप आहे. या वक्तव्यामुळे बजरंग दलाची प्रतिमा मलिन झाली असून संघटनेच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. याच आधारावर न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला होता.(Mallikarjun Kharge)
प्रारंभी न्यायालयाने या प्रकरणाकडे दिवाणी स्वरूपाचे प्रकरण म्हणून पाहिले होते. त्या काळात मल्लिकार्जुन खरगे यांच्या वतीने त्यांचे वकील न्यायालयात हजर राहत होते. मात्र, आता न्यायालयाने या प्रकरणाला फौजदारी स्वरूपाचे मानत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. याच अनुषंगाने न्यायालयाने १५,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी करत मल्लिकार्जुन खरगे यांना १९ सप्टेंबर रोजी वैयक्तिकरित्या न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. खरगे यांचे वकील अॅड. ललित गर्ग यांनीही या कारवाईची पुष्टी केली आहे.(Mallikarjun Kharge)
न्यायालयाने स्पष्ट केले की, पुढील सुनावणीच्या दिवशी मल्लिकार्जुन खरगे वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहिले नाहीत, तर त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले जाऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Mallikarjun Kharge)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक