१५ ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी कायम; १ ऑगस्टपासून केंद्राच्या हद्दीत मासेमारीला परवानगी

राज्याच्या हद्दीत मासेमारी केल्यास कडक कारवाई

Fishing Ban
 
मुंबई : (Fishing Ban) राज्य सरकारने महाराष्ट्रातील मासेमारी बंदीचा कालावधी १५  ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा घेतलेला निर्णय हा राज्यातील मत्स्यसंपदा वाढवण्यासाठी आणि मच्छीमारांच्या दीर्घकालीन हितासाठी असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले. या निर्णयाबाबत कोणताही संभ्रम राहू नये, यासाठी त्यांनी बुधवारी सविस्तर भूमिका मांडली.(Fishing Ban)
 
राणे म्हणाले की, १५  ऑगस्टपर्यंतची मासेमारी बंदी ही केवळ महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीपुरती लागू आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार १  ऑगस्टपासून 12 नॉटिकल मैलांच्या बाहेरील (केंद्र सरकारच्या अधिकारक्षेत्रातील) समुद्री भागात मासेमारी सुरू करण्यास कोणतीही अडचण नाही. त्यामुळे ज्या मच्छीमारांना केंद्राच्या हद्दीत जाऊन मासेमारी करायची आहे, त्यांना राज्य सरकारकडून कोणताही अडथळा आणला जाणार नाही.(Fishing Ban)
 
मात्र, राज्याच्या १२  नॉटिकल मैलांच्या सागरी हद्दीत १५  ऑगस्टपूर्वी कोणत्याही प्रकारची मासेमारी केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यातील मच्छीमारांच्या हक्कांवर गदा आणणारी किंवा अनधिकृत मासेमारी करणारी कोणतीही व्यक्ती अथवा नौका खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मत्स्यसंपदा वाढावी आणि मच्छीमारांचे भवितव्य अधिक सुरक्षित व्हावे, या उद्देशानेच मासेमारी बंदीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगत, सर्व मच्छीमारांनी या नियमांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन नितेश राणे यांनी केले.(Fishing Ban)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर