धर्मांधांकडून कॅब चालकाची निर्घृण हत्या!

२४ तासांत पोलिसांनी लावला छडा; एक फरार उर्वरित आरोप अटकेत

    30-Jul-2026   
Delhi Cab Driver Murder
 
मुंबई : (Delhi Cab Driver Murder) दिल्लीतील कृष्णा नगर परिसरात एका हिंदू कॅब चालकाची हत्या झाल्याचे प्रकरण नुकतेच निदर्शनास आले होते. विजय कुमार असे मृत व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी या 'ब्लाइंड मर्डर' प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावत अयान आणि साहिलसह तीन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे, तर चौथा आरोपी अद्याप फरार आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व दिल्लीतील वेस्ट विनोद नगर येथे राहणारे ४० वर्षीय विजय कुमार हे आपल्या मारुती वॅगनआर कारमधून कॅब सेवा देत होते. आरोपींनी प्रथम मद्यपान केले आणि त्यानंतर एखाद्या कॅब चालकाला लुटण्याचा कट रचला. यानंतर एका आरोपीने दुसऱ्याच्या मोबाईल फोनवरून अॅपद्वारे कॅब बुक केली. बुकिंग मिळाल्यानंतर विजय कुमार प्रवाशांना घेण्यासाठी पोहोचले. सुरुवातीला सर्व काही सुरळीत असल्याचे भासत होते; मात्र काही अंतर गेल्यानंतर आरोपींनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला.(Delhi Cab Driver Murder)
 
विजय कुमार यांनी प्रतिकार केल्याने आरोपींनी त्यांच्यावर चाकूने अनेक वार केले. गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना स्वतःचा बचाव करता आला नाही. त्यानंतर एका आरोपीने विजय कुमार यांच्या मांडीवर बसूनच नशेच्या अवस्थेत कार चालवली. काही अंतरावर जाऊन ही कार दुसऱ्या वाहनाला धडकली. अपघातानंतर आरोपी विजय कुमार यांचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली.(Delhi Cab Driver Murder)
 
कृष्णा नगरमधील रोड क्रमांक ५७ जवळ एका कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ती पडल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. कारमध्ये विजय कुमार गंभीर जखमी अवस्थेत असून त्यांच्या शरीरावर चाकूचे अनेक घाव असल्याचे आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर कृष्णा नगर पोलीस ठाण्यात हत्या आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
 
अशी माहिती आहे की, सुरुवातीला पोलिसांकडे कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. त्यामुळे हे प्रकरण पूर्णपणे 'ब्लाइंड मर्डर' स्वरूपाचे होते. तपासासाठी अनेक विशेष पथके तयार करण्यात आली. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड, तांत्रिक पुरावे आणि स्थानिक गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान संशयितांच्या हालचालींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले आणि अवघ्या २४ तासांत तिघा आरोपींपर्यंत पोहोचण्यात आले.(Delhi Cab Driver Murder)
 
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी २० वर्षीय अयान याच्याविरुद्ध यापूर्वी लुटीचे चार गुन्हे दाखल आहेत. दुसरा आरोपी १९ वर्षीय साहिल असून त्याच्यावर साखळी चोरीचा एक जुना गुन्हा नोंद आहे. तिसरा आरोपी अल्पवयीन आहे, तर फरार आरोपीचे नाव अमन असल्याचे पोलिसांनी सांगितले.(Delhi Cab Driver Murder)
 
लवकर पैसे कमावण्यासाठी रचला होता कट
 
पोलीस चौकशीत आरोपींनी लवकर पैसा मिळवण्यासाठी कॅब चालकाला लुटण्याचा कट रचल्याची कबुली दिली आहे. त्यासाठी त्यांनी आधी चाकूची व्यवस्था केली आणि नंतर मोबाईलवरून कॅब बुक करून विजय कुमार यांना बोलावले. लुटीच्या वेळी विजय कुमार यांनी प्रतिकार केल्यामुळे त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या कटात सहभागी असलेल्या चौथ्या आरोपीची ओळख पटली असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तपासादरम्यान लुटलेला ऐवज तसेच गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचे पुरावेही जप्त करण्यात आले आहेत. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींच्या चौकशीच्या आधारे संपूर्ण हत्येचा कट उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.(Delhi Cab Driver Murder)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर