करुर चेंगराचेंगरीतील मृतांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देणे असंविधानिक!

विजय सरकारचा अध्यादेश मद्रास उच्च न्यायलयाकडून रद्द

    29-Jul-2026
 Madras High Court
 
नवी दिल्ली : (Madras High Court) मद्रास उच्च न्यायलयाच्या मदुराई खंडपिठाने करुर येथील चेंगराचेंगरीत मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना, अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी देण्याच्या तामिळनाडू सरकारचा अध्यादेश रद्द ठरवला आहे. तामिळनाडू सरकारचा हा निर्णय सरकारी नोकरी बाबतच्या संविधानिक नियमांचे उल्लंघन असल्याचेही न्यायलयाने म्हटले आहे. (Madras High Court)
 
गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात विजय यांच्या करुर येथील प्रचार सभेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 41 जणांचा मृत्यु झाला होता. त्याचबरोबर अनेकांना गंभीर दुखापत झाल्याचेही समोर आले होते. त्यानंतर तामिळनाडूच्या निवडणुकीदरम्यान विजय यांनी मृतांच्या नातेवाईकांना सत्तेत येताच अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचे आश्वासनही दिले होते. या आश्वासनाच्या पूर्तीचा अध्यादेश विजय यांच्या सरकारने अलीकडेच प्रसिद्ध केला होता. (Madras High Court)
 
मात्र, हा अध्यादेश संविधांनातील तरतूदींचे उल्लंघन असून, सरकारने संविधानाच्या चौकटीतच कार्य करणे आवश्यक असते. जर, सरकारच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण नसल्यास अनागोंदी माजेल अशी भीतीही न्यायलयाने व्यक्त केली. त्याचप्रमाणे, सरकारी नोकरीचे वाटप केले जाऊ शकत नाही, त्यासाठीची पात्रता पडताळणी होणे आवश्यक असल्याचेही न्यायलयाने नमूद केले. तसेच, सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत अनेक लोक असून, अशा पद्धतीने नोकरीचे वाटप झाल्यास त्यांच्यावर अन्याय होईल, असेही निरीक्षण न्यायलयाने नोंदवले आहे. (Madras High Court)
 
 




संबंधित मजकूर