सोनी मराठीने केली 'कोण होणार करोडपती'च्या नव्या पर्वाची घोषणा

    29-Jul-2026
Kon Honar Crorepati Sony Marathi
 
मुंबई : (Kon Honar Crorepati Sony Marathi) महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षकांच्या ज्ञानाची, आत्मविश्वासाची आणि स्वप्नांची साथ देणारा सोनी मराठी वाहिनीचा लोकप्रिय ज्ञानावर आधारित कार्यक्रम 'कोण होणार करोडपती' पुन्हा एकदा नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या अनेक पर्वांपासून या कार्यक्रमाने असंख्य स्पर्धकांना आपल्या ज्ञानाच्या बळावर मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी साथ दिली आहे. प्रत्येक घरात चर्चेचा विषय ठरलेला हा कार्यक्रम आता नव्या जोमाने आणि नव्या उत्साहाने पुनरागमन करत आहे.
 
या नव्या पर्वाची उत्सुकता वाढवत सोनी मराठी वाहिनीने 'कोण होणार करोडपती'च्या नव्या पर्वाचा अधिकृत लोगो अनावरण करत "लवकरच" अशी घोषणा केली आहे. नव्या लोगोमधून कार्यक्रमाचा भव्यपणा, प्रतिष्ठा आणि ज्ञानाचा प्रवास पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार असल्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते. या घोषणेनंतर सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये नव्या पर्वाविषयीची उत्सुकता आणखी वाढेल यात काही शंका नाही.(Kon Honar Crorepati Sony Marathi)
 
'कोण होणार करोडपती' हा केवळ प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम नसून, सामान्य माणसाच्या ज्ञानाला व्यासपीठ देणारा, आत्मविश्वास वाढवणारा आणि आयुष्य बदलण्याची संधी देणारा एक प्रेरणादायी प्रवास आहे. प्रत्येक प्रश्नासोबत वाढणारा थरार, स्पर्धकांच्या संघर्षाच्या प्रेरणादायी कथा आणि करोडपती होण्याच्या स्वप्नाचा प्रवास यामुळे या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.(Kon Honar Crorepati Sony Marathi)
 
प्रेक्षकांनी या बहुप्रतीक्षित पर्वासाठी सज्ज राहावे. 'कोण होणार करोडपती' लवकरच फक्त सोनी मराठी आणि Sony LIV वर.(Kon Honar Crorepati Sony Marathi)
 
Teaser Link - https://www.instagram.com/reel/DbTSrcEMfye/?igsh=MXBxcG5laWFyemgwdw==(Kon Honar Crorepati Sony Marathi)
 
 




संबंधित मजकूर