मुंबई : नुकताच आलिया भट्टचा ‘अल्फा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. समय रैनाच्या ‘इंडियाज् गॉट लेटंट’मध्ये या चित्रपटाचे प्रमोशन आलियाने केले होते. त्यानंतर हा चित्रपट चर्चेत आला. मात्र, प्रदर्शनानंतर तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी चित्रपटाच्या ‘टीम’ने ऋतिक रोशनची एण्ट्री असलेला सीन इन्स्टाग्रामवर व्हायरल करण्याची रणनिती आखली. पर्यायाने या-नात्या पेजद्वारे ऋतिकची एण्ट्री असलेली रिल व्हायरल झाली. चित्रपटात ऋतिकची झलक पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटर गाठले आणि एकूणच जगभर हा सिनेमा शंभर कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला. त्यामुळे इन्स्टाग्रामचा प्रभाव काय असतो हे लक्षात येईल.
गेले काही दिवस सुरू असलेले ‘कॉक्रोज जनता पार्टी’चे आंदोलनही ‘इन्स्टाग्राम’वर सुरू झाले होते. बोस्टन येथे राहणाऱ्या अभिजीत दिपके या तरुणाने न्यायालयाने केलेल्या टीपण्णीनंतर ‘कॉक्रोज जनता पार्टी’ या नावे ‘इन्स्टाग्राम’वर खाते सुरू केले. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ‘फॉलोअर्स’ची संख्या वाढली. परिणामी देशात नीट परीक्षांच्या पेपरफुटेचे प्रकरण सरकारने बाहेर काढल्यानंतर या प्रकरणात तत्कालीन शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला जाऊ लागला. अर्थात आंदोलनाला यश आले आणि शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. पण ही सर्व लढाई ‘इन्स्टाग्राम’वर लढवली गेली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याच ‘इन्स्टाग्राम’चा वापर ‘जेन-झी’ तरुणाईशी बोलण्यासाठी केला होता. त्यांनी सुरुवातीला रात्री ‘सेल्फी व्हिडिओ अपलोड’ केला, ज्यात त्यांनी आंदोलकांच्या मुद्द्यांवर सरकार सकारात्मक आहे, असेही म्हटले. याशिवाय पहिल्या व्हिडिओमुळे त्यांचे एकूण १० लाख फॉलोअर्स वाढले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी विद्यार्थी आंदोलकांचे आभार मानणारा दुसरा व्हिडिओही इन्स्टाग्रामद्वारेच केला. त्यात त्यांना पहिल्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये सुचविण्यात आलेल्या सूचनांचेही त्यांनी पालन केले. याच इंटरएक्टीव्ह मॉडेलचा वापर आता भारतीय जनता पक्ष प्रभावीपणे करताना दिसत आहे. [ Prime Minister Narendra Modi selfie video]
‘जेन-झी’ आंदोलनाचा सूर काहीसा मावळल्यानंतर भाजपने तरुणाईशी संवाद साधण्यासाठी इन्स्टाग्रामचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. ज्यात आंदोलनाबद्दल थेट संवाद साधून कशाप्रकारे आंदोलनात काही अराजकतावादी चेहरे घुसले होते, हे पटवून देण्याचा प्रयत्न या रिल्समध्ये करण्यात येत आहे. अशाच एका ‘जीम’मध्ये तरुणाई या आंदोलनाबद्दल चर्चा करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या भाजपने प्रदर्शित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने ‘इन्स्टाग्राम’द्वारे तरुणाईशी संवाद साधण्यावर भर दिलेला दिसतो. दुसरीकडे आंदोलनाआडून सरकारला बदनाम करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चेहऱ्यांना उघडे पाडण्याचे कामही भाजपच्या सोशल मीडियाद्वारे सुरू आहे. ही लढाई ज्याप्रकारे सीजेपीद्वारे सोशल मीडियावर लढली गेली, त्याच प्रकारे देशविरोधी कारवाया करणाऱ्यांच्या विरुद्ध आवाज म्हणून अनेक सोशल मीडिया हँडल्सद्वारे आंदोलनात राजकीय पोळी भाजून घेणाऱ्यांवरही बोट ठेवण्यात आले. या अराजकतावाद्यांना तरूणाईसमोर उघडे पाडण्याचे काम यानिमित्ताने होत आहे.
राहुल गांधी आणि काँग्रेसींचा विद्यार्थी विरोधीचेहरा पहिल्याच दिवशी उघड
अधिवेशनात 'सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकार प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६' सादर केले जात आहे. सोमवार, दि. २७ जुलै रोजी अधिवेशनाचा पहिला दिवस होता. यावेळी सरकारतर्फे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत मांडले. मात्र, विरोधकांनी यावेळीही गदारोळ सुरू केला. ज्या विधेयकासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले, त्या विधेकयालाच विरोध करण्याचे काम विरोधी पक्ष करत होता. दिवसभरात लोकसभा आणि राज्यसभा दोनवेळा स्थगित करण्यात आली. याचे पडसादही सोशल मीडियावर उमटू लागले. भाजप समर्थक असणारे बीजेपी-जेन-झी नामक इन्स्टाग्राम अकाऊंटही दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींवर भाष्य करत आहे. त्यात पार्श्वसंगीत, व्हीज्युअल्सद्वारे जेन-झी प्रेक्षकांशी संवाद साधला जाऊ शकतो.
‘अबकी बार मोदी सरकार’ची पुनरावृत्ती होणार!
ज्याप्रकारे २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अबकी बार मोदी सरकार, अशी टॅगलाईन सोशल मीडियावर व्हायरल केली होती. त्या गोष्टीला आता १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. सोशल मीडियाचा वापरही वाढला आहे. जेन-झी ही तरुणाईही २०२९च्या लोकसभा निवडणूकीत मतदान करणार आहे. यासाठी भाजपने जेन-झीशी संवाद साधण्यासाठी इन्स्टाग्रामचा प्रभावी वापर केल्याचा दिसून येतो. या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे इन्स्टाग्रामचा वापर केला. तसाच वापर पुढील काळात दिसून येऊ शकतो. [Prime Minister Narendra Modi selfie video]
मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.