ठाणे : (Namo Sahakar Taxi) नमो सहकार टॅक्सी उपक्रम यशस्वी करण्यासाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यात मेळावे टप्प्याटप्प्याने आयोजित करू, सहकारातील ही संकल्पना यशस्वी करणे, हाच एकमेव उद्देश आहे, अशी प्रतिक्रिया ज्यांच्या संकल्पनेतून अँप आधारित नमो सहकार टॅक्सी उपक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे, त्या भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी माध्यमांना दिली.
आज ठाणे भाजपा कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात नमो सहकार टॅक्सी संकल्पनेची माहिती चालक, मालकांना देण्यासाठी ठाण्याचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या विनंतीवरून मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, नमो सहकार टॅक्सी उपक्रमाचे वरिष्ठ अधिकारी सुदेश रोझेकर, ठाण्यातील चालक, मालक संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने टॅक्सी , रिक्षा चालक, मालक उपस्थित होते. (Namo Sahakar Taxi)
सहकारात प्रवीण दरेकर यांनी अनेक यशस्वी उपक्रम राबवले आहेत आणि त्याचा फायदाही सर्वसामान्यांना झाला आहे. दरेकरांनी टॅक्सी/रिक्षा चालक, मालकांच्या फायद्यासाठी सहकारातून सुरू केलेल्या उपक्रमला यशस्वी करण्यासाठी मीच त्यांच्याकडे मेळाव्याची मागणी केली होती. कारण हा उपक्रम कंपन्यांच्या जोखडातून चालक, मालकाना मुक्त करणारा उपक्रम आहे. सर्वांनी नमो सहकार टॅक्सीमध्ये नोंदणी करावी, असे आवाहनही आमदार निरंजन डावखरे यांनी या प्रसंगी केले. (Namo Sahakar Taxi)
आमदार संजय केळकर यांनीही या मेळाव्याला संबोधित केले. तळागाळातील समाजाचे प्रश्न आजपर्यंत सहकारातूनच सुटले आहेत, दिवसरात्र कष्ट करणाऱ्या चालक, मालकांसाठी प्रवीण दरेकर यांनी एक पाऊल टाकले आहे, आणि त्यांना साथ देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कारण, आजपर्यंत कंपन्यांनी चालकांचे स्वतःच्या फायद्यासाठी शोषण केलं, आता नमो सहकार टॅक्सी च्या माध्यमातून सहकारातील नवा पर्याय आपल्याला मिळाला आहे, मी ही संकल्पना समजून घेतली आहे आणि मला विश्वास आहे की, हा पर्याय केवळ उत्पन्न वाढवणारा नाही तर चालकांना सन्मान देणारा, त्यांना भागीदार बनवणारा उपक्रम आहे. तुम्ही तर नोंदणी कराच पण तुमच्या संपर्कातील सहकारी, मित्र यांनाही नोंदणी करण्याचा आग्रह करा.(Namo Sahakar Taxi)
कार्यक्रमात दरम्यान नमो सहकार टॅक्सीचे वरिष्ट अधिकारी सुदेश रोझेकर यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती टॅक्सी, रिक्षाचालक-मालक यांना दिली आणि त्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन केले. या मेळाव्याच्या निमित्ताने एका दिवसात १०० पेक्षा जास्त चालकांनी नमो सहकार टॅक्सी अँप मध्ये आपली नोंदणी केली आहे. (Namo Sahakar Taxi)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.