मुंबई( Mumbai Reservoir Water Level): मुंबईला दररोज पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे पाणीसाठ्यात विक्रमी वाढ झाली आहे. मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने आज (दि२७) सकाळी ६ वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार, साताही धरणांमध्ये मिळून तब्बल ८८.४० टक्के (१२ लाख ७९ हजार ५३४ दशलक्ष लिटर) उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. ( Mumbai Reservoir Water Level)
गेल्या वर्षी (२०२५) याच दिवशी धरणांमध्ये ८९.७० टक्के तर २०२४ मध्ये ७१.९५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदाही जुलै अखेरपर्यंत धरणांची स्थिती अत्यंत समाधानकारक आहे. ( Mumbai Reservoir Water Level)
चार तलाव ओव्हरफ्लो झाले असून उर्वरित तीनही पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहेत.मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या सात महत्त्वाच्या तलावांपैकी चार तलाव आधीच पूर्ण भरून वाहू लागले आहेत:
विहार तलाव ७ जुलै रोजी रात्री ९ वाजता १०० टक्के भरून ओव्हरफ्लो झाला.तुलसी तलाव ७ जुलै रोजी रात्री ११:४३ वाजता १०० टक्के भरला.
तानसा धरण २२ जुलै रोजी सकाळी ८:५१ वाजता १०० टक्के भरून ओव्हरफ्लो झाले.तर
मोडक सागर धरण २३ जुलै रोजी पहाटे २:०७ वाजता १०० टक्के क्षमतेने भरले.( Mumbai Reservoir Water Level)
धरणांमधील आजचा उपयुक्त पाणीसाठा (तपशील):
धरणाचे नाव आजचा पाणीसाठा (%)पाणीसाठा (दशलक्ष लिटर)एकूण पावसाची नोंद (मिमी)
अप्पर वैतरणा७५.७६%१,७२,०२२२,३४७ मिमी
मोडक सागर१००.००%१,२८,९२५२,२७४ मिमी
तानसा९८.९३%१,४३,५३४२,११० मिमी
मध्य वैतरणा९१.२१%१,७६,५१६१,९४२ मिमी
भातसा८६.८६%६,२२,७९४१,९२९ मिमी
विहार१००.००%२७,६९८२,०८५ मिमी
तुलसी१००.००%८,०४६२,८५१ मिमी
एकूण पाणीसाठा८८.४०%१२,७९,५३४-
भातसा अन् अप्पर वैतरणातही मोठा जलसाठा :
मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात सध्या ८६.८६ टक्के तर मध्य वैतरणा धरणात ९१.२१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. अप्पर वैतरणा धरणात ७५.७६ टक्के साठा झाला असून, येत्या काही दिवसांत पडणाऱ्या पावसाने सर्व धरणे शंभर टक्के भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ( Mumbai Reservoir Water Level)
दरम्यान, भांडुप कॉम्प्लेक्स परिसरात आज २५ मिमी पावसाची नोंद झाली असून या हंगामातील एकूण पाऊस २,२४६ मिमी नोंदवला गेला आहे. जुलै महिन्यातच धरणांमध्ये झालेला हा भरघोस साठा पाहता मुंबईकरांची पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटण्याच्या मार्गावर आहे. ( Mumbai Reservoir Water Level)