दै. मुंबई तरुण भारत इम्पॅक्ट; गोपाळगड मालकी हक्काचा तिढा अखेर सुटला, पुरातत्व विभागाकडून अधिकृत भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात

    28-Jul-2026   
 
Gopalgad Fort Land Acquisition
 
 
मुंबई (Gopalgad Fort Land Acquisition) : गुहागरच्या अंजनवेल येथील ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्काचा वाद आणि त्याच्या संवर्धनाचा प्रश्न गंभीर बनला असतानाच अनेक शिवप्रेमींसाठी एक आनंदाची घटना समोर आली आहे. गोपाळगड किल्ल्याचा खासगी जागेबाबतचा वाद आता कायमस्वरूपी संपुष्टात येणार आहे. पुरातत्व विभागाने हा किल्ला पूर्णपणे शासकीय अखत्यारीत आणण्यासाठी अधिकृत भूसंपादन प्रक्रिया सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. दै. मुंबई तरुण भारतने वारंवार याविषयी केलेल्या पाठपुराव्याचे हे यश आहे.(Gopalgad Fort Land Acquisition)
 
सागर पवार नावाच्या एका पर्यटकाने गोपाळगड किल्ल्याची झालेली दुरवस्था आणि त्यावर झालेला कथित कब्जा एका विडिओद्वारे उघडकीस आणल्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आले होते. अय्याज मणियार याने या किल्ल्यावरील आपला हक्क सांगितल्यानंतर गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हकाबाबतचा वाद पुढे आला. (Gopalgad Fort Land Acquisition)
 
त्यानंतर याप्रकरणी दै. मुंबई तरुण भारतने केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी संबंधित विषयाची दखल घेतली आणि अहवाल सादर करण्याचे रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. किल्ला मराठा कालखंडातील असून त्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता उपलब्ध अभिलेख, लिलाव प्रक्रिया, इव्हॅक्युई प्रॉपर्टीचा दर्जा आणि संबंधित कागदपत्रांची बारकाईने तपासणी करावी, असे ते म्हणाले होते. (Gopalgad Fort Land Acquisition)
 
वास्तविक गोपाळगड हा राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाकडून राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झालेला आहे. नियमांनुसार अशा ऐतिहासिक स्मारकांच्या ठिकाणी पर्यटकांना विनाअडथळा आणि मोफत प्रवेश मिळणे बंधनकारक आहे. मात्र खासगी मालकी हक्कामुळे किल्ल्याचे संवर्धन आणि पर्यटकांची सुरक्षितता धोक्यात आली होती. यावर प्रशासनाने अखेर भूसंपादनाचा कायदेशीर मार्ग अवलंबत महत्वाचे पाऊल उचलले आहे. (Gopalgad Fort Land Acquisition)
 
भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होताच गोपाळगड किल्ल्याची जागा अधिकृतपणे शासनाच्या नावावर हस्तांतरित होईल. त्यानंतर पुरातत्व विभागामार्फत किल्ल्याच्या ढासळलेल्या तटबंदीची दुरुस्ती, मुख्य प्रवेशद्वाराचे जतन, माहिती फलक आणि पर्यटकांसाठी आवश्यक प्राथमिक सुविधा तातडीने उभारल्या जातील. (Gopalgad Fort Land Acquisition) 
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर